पंढरपूर (बारामती झटका)
एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनास संभाजी ब्रिगेड पंढरपूर यांच्यावतीने पंढरपूर बसस्थानकावरील आंदोलन स्थळी जाऊन पाठिंबा जाहीर केला त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामध्ये कर्मचाऱ्यास सातवा वेतन आयोग लागू करा, एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करा यासह अन्य न्याय मागण्या संदर्भात आंदोलन सुरु असून या मागण्या योग्य आहेत व त्या महाराष्ट्र शासनाने त्वरित मान्य कराव्यात, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने या अगोदर स्पष्ट केलेले आहे. त्या संदर्भात मा. प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिलेला आहे. व आज संभाजी ब्रिगेड पंढरपूर यांच्यावतीने पाठिंबा दिला.
यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री किरणराज घाडगे, तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब बागल, शहराध्यक्ष शिवश्री स्वागत कदम, तालुका उपाध्यक्ष शिवश्री शेखर आटकळे, शिवश्री आकाश पवार आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng