एस्. एम्. हायस्कूलच्या १९७६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

कुणकेश्वर (बारामती झटका)

१९७६ची दहावीची बॅच, व्हाटसग्रुप आहे, फोनवरून बोलण होत असत, पण प्रत्यक्षात भेट म्हणजे स्वर्गीय आनंदच. तोच अविस्मरणीय क्षण कुणकेश्वरच्या पुण्यभुमीत अनुभवला. आजच्या घडीला माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी केव्हाच आज्जी-आजोबा झालेले आहेत. प्रत्यक्ष मित्र-मैत्रिणींची भेट होताच वय क्षणात कमी झाल, आणि१ ९७६ च्या आठवणींना उजाळा मिळाला. आत्ताच्या घडीला सर्वच मित्र-मैत्रिणी आपआपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेले आहेत. २००९ साली ३३ वर्षांनी एकत्र आलो होतो, परत १२ वर्षांनी हा स्नेह मेळाव्याचा योग जुळून आला. ४६ वर्षांचे कणकवली येथील एस्. एम्. हायस्कूलच्या सन १९७६ च्या दहावीच्या माजी विध्यार्थ्यांचे हे अतुट नाते त्यांच्या आत्मविश्वासाने प्रेमबंधनात-स्नेहात टीकुन आहे, हे विशेष. एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली गेली. जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्याकाळातील मौज, मजा, मस्ती पुन्हा अनुभवली. माणूस म्हणून जगत असताना हे क्षण विस्मरणात गेले असते तर, आयुष्यात काहीतरी गमावल्यासारख वाटल असत. पण हे अनमोल क्षण अनुभवण्याची संधी दिली ते माजी विद्यार्थी व आमचे उद्योजक मित्र नंदु आळवे आणि संजय पाध्ये यांचे विशेष कौतुक. त्यांनी हा स्नेहमेळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन संपन्न झाला. त्याच महिला दिनाचे औचित्य साधत जनजागृती सेवा समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष माजी विद्यार्थिनींचा माजी विद्यार्थी व माजी आमदार राजन तेली व माजी विद्यार्थी माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश नाडकर्णी यांच्या हस्ते “सन्मानपत्र” प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले. स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतो,घडाळ्याच्या काट्यानुसार कामाचे तास ठरविणा-या लोकांना सग्यासोय-यांकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो,पण या धकाधकीच्या जीवनातही वेळात वेळ काढून एकत्र येऊन सुखदुःखांची देवाणघेवाण करुन चार क्षण आनंदात घालविण्याचा हा पायंडा आदर्शवतच आहे.दोन दिवस संपन्न झालेल्या या स्नेहमेळ्याचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी भरत तोरसकर यांनी केले.व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थीनी सौ.रजनी चिंचळकर-पाध्ये हिने केले.अशा प्रकारे कणकवलीत एस्.एम्.हायस्कूलच्या सन १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळा कुणकेश्वर स्थळी उत्साहात संपन्न झाला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कारखाना सुरू करतो म्हणाले सुरू केला, थकित बिल देतो म्हणाले बिल देणे गरजेचे आहे
Next articleमाळशिरसचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे फरतडी निटवेवाडी येथील मारुती मंदिर परिसरात सभामंडपास सहकार्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here