ऑफलाईन धान्य वाटप करण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने मागणी

माळशिरस (बारामती झटका)

मागील महिन्यापासून मशीन नीट चालत नाहीत, फोरजी नेटवर्क व टोजी मशीन या कारणांमुळे मशीन नीट चालत नसल्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नाही व धान्य घेण्यासाठी मोलमजुरी सोडुन वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे रेशनकार्ड धारक धान्यापासुन वंचित आहेत. व सर्व रेशनिंग दुकानांपुढे लोकांच्या लांबच लांब रांगा असल्याचे चित्र दिसत आहे.

ऐन निवडणूक काळामध्ये धान्य वाटप कसे करावे, असा प्रश्न रेशन दुकानदारांपुढे पडला आहे. यामुळे विनाकारण तक्रारी होऊ शेकतात. धान्य दुकानात उपलब्ध असुनही धान्य वाटप करता येईना. त्यामुळे रेशनकार्ड धारकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे, याचा नाहक त्रास हा दुकानदारांना सहन करावा लागत आहे. धान्यासाठी हेलपाटे मारावे किती व धान्य मिळणार कधी, या प्रतीक्षेमध्ये ग्राहक बसले आहेत. या कारणांमुळे दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये नाहक वादविवाद होत आहेत.

त्यासाठी धान्य दुकानदारांकडून ऑफलाईन धान्य वाटप करण्यासाठी मागणी संघटनेच्या वतीने मा. श्री. निवासी नायब तहसीलदार श्री तुषार देशमुख साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय मंडलिक, उपाध्यक्ष दयानंद शेळके, ज्येष्ठ दुकानदार कुलकर्णी काका, वसंत जाधव, पाठक काका, श्रीराम जाधव, अफसर बागवान, संजय खराडे, युवराज माने देशमुख, रणजितसिंह भगत, ढोबळे दुकानदार, शिवाजी लोखंडे, अक्षय मिले आदी दुकानदार उपस्थित होते.

फोरजी नेटवर्क व टोजी मशीन असल्याकारणाने मशीन नीट चालत नाहीत. परिणामी, रेशन दुकानदार हे सकाळी 8 वाजल्यापासुन रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने चालु ठेवत आहेत, तरीही काही उपयोग होत नाही. निवडणूक काळ असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा दुकानदारांपुढे दुकान बंद ठेवून संपावर जाण्याशिवाय पर्याय नाही. – विजय मंडलिक, तालुका अध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वकर्तुत्वाने उद्योग व्यवसायात प्रगती करून गावात पहिल्यांदा फॉर्च्यूनर घेण्याचा बहुमान मिळवलेला
Next articleसंत चोखामेळा महाराज हे समता आणि बंधुता या विचारांचे अधिष्ठान होय – स्वामी नरेंद्राचार्य महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here