ओबीसीचे आरक्षण मिळाल्याबद्दल वेळापूर सोसायटीत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा

वेळापुर ( बारामती झटका)

वेळापुर ता. माळशिरस येथे माळी समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्बल वेळापुर विविध कार्यकारी सेवा संस्था मर्या. येथे भाजपाच्या कार्यकत्यांनी पेढे भरवुन आनंदोत्सव केला. यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांनी माळशिरस तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष शंकरराव काकुळे यांना पेढा भरविला. तसेच रिपाई आठवले गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलींद सरतापे यांनी सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष आणि वेळापुर सोसायटीचे व्हा. चेअरमन महादेभाऊ ताटे यांना पेढा भरवुन ओबीसी आरक्षण मिळाल्याबद्बल आनंदोत्सव साजरा केला. तसेच यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी ॲड. रामचंद्र ताटे, ॲड. दत्ताञेय राऊत, दिपक राऊत, महादेव पिसे, चंद्रकांत बनकर, तुकाराम राऊत, चंद्रकांत आडत, इसाक पठाण, श्रीधर देशपांडे, दत्ताञेय बनकर, राजकुमार शिंदे, तुकाराम यादव, संतोष सुक्रे, राजकुमार पोरे, भैय्या कोडग, माऊली राऊत, शिवाजी जाधव, दत्ताञेय आडत, गोविंद भानवसे, शिवाजी बनकर, मोहसीन कोरबु, राजकुमार माने देशमुख, संतोष माने देशमुख, अमित काटे, प्रकाश कुलकर्णी, गिरीष कुलकणीॅ, नाना एकतपुरे, अजीत बनकर, शिवाजी आडत, दत्ताञेय म्हेत्रे, माउली मेहञे, महादेव आडत, सोमनाथ चांडोले, अनिल राऊत, गणेश आडत, जयसिंग घोडके, सतीश नवले, बन्या वाघमारे तसेच सर्व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस तसेच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, तसेच भाजपा जिल्हासंघटक धैर्यशील मोहिते पाटील आदिंनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी सहकार्य केल्याबद्बल ओबीसी समाजाच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविजयवाडी येथे कृषीकन्यांकडून सहभागी ग्रामीण मुल्यांकन व गावातील विविध क्षेत्रातील लोकांच्या कार्याची माहिती व चर्चा
Next articleएकशिव पाणी वापर संस्थेमधील भ्रष्टाचाराबाबत अधीक्षक अभियंता यांना कार्यकारी अभियंता यांचे पत्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here