अकलुज (बारामती झटका)
अभिनेत्री कंगना राणावत यांनी जे काही वक्तव्य केलेले आहे, त्याचा निषेध करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. अकलूज पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य शिवमती प्रिया नागणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कलाक्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगना राणावत यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. कलाक्षेत्र वगळता प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले बेताल वक्तव्य करत प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करीत असतात. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर नसून सध्या त्या हवेत आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर देशाचा अवमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळवण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांचा तसेच सैनिकांचा अपमान झाला असून या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा गांभीर्याने विचार करून पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास जिजाऊ ब्रिगेड राज्यभर आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला
यावेळी शिवमती अक्काताई माने, शिवमती वनिता कोरटकर, शिवमती हेमा सांगडे, वंदना सांगडे, शिवमती निता देशमुख, रोहिणी भोंग, सुरेखा साठे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng