कंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकून प्रगतिशील शेतकरी ठार

मोहोळ जवळ आरटीओची गाडी आडवी लावल्याने अपघात

आरटीओ अधिकाऱ्यांसह कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा

मोहोळ (बारामती झटका)

मोहोळ येथून सोलापूरकडे निघालेल्या एका कंटेनरला थांबविण्यासाठी आरटीओची गाडी आडवी लावल्याने मोहोळकडून शिरापूरकडे निघालेली मोटर सायकल कंटेनरला पाठीमागून धडकली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडली.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने कंटेनर (एमएच ४६ बी एम २९१०) निघाला असताना पाठीमागून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या गाडी (एमएच ०४ केआर ६४५८) तील आरटीओ अधिकाऱ्याने कंटेनरला ओव्हरटेक करीत गाडी आडवी घालून कंटेनर उभा करण्यास सांगितले. त्यामुळे कंटेनर जागीच उभा राहिला. यादरम्यान, पाठीमागून मोहोळकडून शिरापूरकडे गावी निघालेले प्रगतिशील बागायतदार मोहन दत्तात्रय आदमाने (वय ५५) हे मोटर सायकल (एमएच १३ सीएक्स १४०३) वरून जात असताना अचानक उभारलेल्या कंटेनरवर मोटर सायकल धडकून ते जागीच ठार झाले.
यादरम्यान, यातील आरटीओ कार्यालयाच्या गाडीतील अधिकारी राजेश आहुजा, शिवाजी सोनटक्के यांच्यासह गाडीतील इतर कर्मचारी व कंटेनर चालक यांच्यावर अमोल अर्जुन आदमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहे.

कंटेनरच्या काचा फोडल्या
आरटीओच्या हलगर्जीपणामुळे सदरचा अपघात घडल्याची घटना समजताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन आरटीओच्या गाडीतील अधिकारी राजेश आहुजा शिवाजी सोनटक्के यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करीत आरटीओ गाडी सह कंटेनर च्या काचा फोडल्या दरम्यान घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत पुढील होणारा अनर्थ टाळून जखमी आरटीओ अधिकाऱ्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवून दिले.

खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह आणून ठेवून मोहोळ पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालत आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर यातील काही युवकांनी येथील पोलिसांनाच शिवीगाळ केली यावेळी झालेला गोंधळ पाहून पोलिसांनी बळाचा वापर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकिर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचा सप्ताह.
Next articleह.भ.प. गुरव महाराज पंढरपूरकर यांचे माळशिरस येथे सुश्राव्य किर्तन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here