कचरेवाडी ग्रामस्थ व रवीशेठ सरगर मित्र मंडळाच्या वतीने वावरे दांपत्य यांचा उत्साही वातावरण व जल्लोषात सन्मान संपन्न.

माळशिरस नगरपंचायतच्या बिनविरोध नगरसेविका सौ. ताई वावरे व उद्योजक सचिन आप्पा वावरे यांचा सपत्नीक सन्मान सोहळा संपन्न.

कचरेवाडी ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष बिनविरोध नगरसेविका सौ. ताई सचिन वावरे आणि युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांचा सपत्नीक सन्मान सोहळा कचरेवाडी ग्रामस्थ व रवी शेठ सरगर मित्र मंडळाच्या वतीने उत्साही वातावरणात व जल्लोषात सन्मान सोहळा संपन्न झाला.
माळशिरस नगरपंचायत अटीतटीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ. ताई सचिन वावरे या बिनविरोध नगरसेविका झालेल्या असल्याने कचरेवाडी ग्रामस्थ आणि रवीशेठ सरगर मित्र मंडळाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित केलेला होता. ग्रामस्थांच्यावतीने सरपंच नवनाथ कचरे यांनी सत्कार केला तर मित्र मंडळाच्यावतीने रवी शेठ सरगर व जयश्री सरगर यांनी सन्मान केला. गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक संघटना यांनीही सन्मान केला.

नगरसेविका सौ‌ ताई सचिन वावरे आणि युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे यांना मानाचा फेटा बांधून एकाच हारामध्ये गुंफून पेढा भरवून सन्मान सोहळा संपन्न झाला.


यावेळी सरपंच नवनाथ कचरे, कचरेवाडीचे युवा नेते रवीशेठ सरगर, कांतीलाल सरगर, आकुंश कोळेकर, गोरे सर, सचिन सरगर, संजय तरडे, संपत सरक, सजेराव कचरे, आप्पा गणपत सरगर, राजु सरगर, भानुदास कोळेकर, सुरेश कोळेकर, मोठे सर गणेश सजे, महादेव कचरे, अर्जुन सरगर, हनुमंत तरडे, मयुर सरगर, जयवंत गोरडे, राजु खवळे, पोपट दणाने, भिमा सरगर, वैभव कोळेकर, रामभाऊ दादा कोळेकर, मच्छिंद्र सरक, मारुती तरडे, रामभाऊ कचरे, संतोष विरकर, नामदेव विरकर, विष्णु पंढरीनाथ विरकर, तरडे, बापु शंकर कचरे, गोरक्ष शिंगाडे, ज्ञानदेव मय्यापा विरकर, सचिन गोरे, सुनील गोरे, दतु सरगर, सजेराव कोळेकर, नाना विठ्ठल वाघमोडे, टेळे महाराज, पप्पु सजे, आनिल वाघमोडे, उमाकांत सजे, संतोष कचरे, सुनील विरकर, भानुदास सरगर, पप्पु कोळेकर, बाजीराव कोळेकर, अनिल सरगर, माऊली गोपाळ सरगर, संतोष सरगर, तानाजी कोळेकर, तानाजी दणाने, हनुमंत विरकर, विठ्ठल कोळेकर, विनोद खवळे, पलु दणाने, शिवाजी रामचंद्र कोळेकर, बडी सरक, रामचंद्र बापु सरगर, सतेश विरकर, समाधान कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजांबुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महावीर माने बिनविरोध, नारायण पाटील गटाचे पुन्हा वर्चस्व
Next articleआळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गातील गट नंबर 1059 क्षेत्राची चौकशी करावी – दीपक माने देशमुख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here