कचरेवाडी येथील सख्या कारभारी भावाने फसवणूक केल्याप्रकरणी अकलूज पोलीस स्टेशन येथे जेरबंद.

घरातील कर्त्या कारभाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याने अनेकांचे धाबे दणाणले.

माळशिरस ( बारामती झटका )

कचरेवाडी ता. माळशिरस येथील नागनाथ चंद्रहार गोरे यांनी कारभारी भाऊ सतीश चंद्रहार गोरे त्यांनी परस्पर टिप्पर स्वतःच्या नावे बनावट सह्या व अंगठा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे अधिकारी व एजंट यांना हाताशी धरून मूळ कागदपत्रांमध्ये फेरबदल करून सदरचे वाहन स्वतःच्या नावे करण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नागनाथ गोरे यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे सतीश गोरे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 420, 406, 470 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. त्यामुळे कारभारी असणारे यांच्यामध्ये खळबळ माजलेली आहे.

अकलूज पोलीस स्टेशन येथे नागनाथ गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ व भावजय असे एकत्र राहत होते. कालांतराने विभक्त राहिलेले होते. नागनाथ यांच्या नावे अशोक लेलँड कंपनीचा बिहार पासिंग असलेला बी आर 29 जीए 2662 सदरचा टिपर चोला फायनान्स कंपनी यांचेकडून घेतलेला होता. सदरचा टिपर महाराष्ट्र पासिंग एम एच 45 ए एफ 4112 असा केलेला होता. सदरचा टिपर नागनाथ चंद्रहार गोरे यांच्या नावावर होता. आरोपी सतीश गोरे यांनी परस्पर बनावट सह्या व अंगठे करून सदरचा टिपर कारभारी भावाने स्वतःच्या नावावर केलेला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागनाथ गोरे यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे. या घटनेचा अधिक तपास अकलूज उपविभागीय अधिकारी पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे आणि अकलूज पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्‍मण पिंगळे तपास करीत आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सतीश गोरे यांना पोलिसांनी जेरबंद करून ठक गिरी करणाऱ्या सतीशच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक घटना घडलेली असल्याने कारभारी मंडळींमध्ये खळबळ माजलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्याच्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मधुकर पाटील राष्ट्रवादीचे हिंदकेसरी ठरले.
Next articleगुरसाळे सेवा सोसायटीच्या निवडणुकीत श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here