‘कचरे हार्डवेअर’ या भव्य शॉपचा उद्घाटन समारंभ नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्यासह नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न…
माळशिरस ( बारामती झटका )
कचरेवाडी ता. माळशिरस येथील कचरे बंधू यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कचरे हार्डवेअरचा शुभारंभ मंगळवार दि. ०३/०५/०२०२२ रोजी सकाळी १० वा. माळशिरस नगर पंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख, युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग देशमुख, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, कैलास वामन, प्रवीण केमकर, माजी नगरसेवक मारुती देशमुख, मारुती सिद, मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, मनसेचे तालुका माजी सरचिटणीस शामराव बंडगर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे.
कचरेवाडी येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय रामहरी कचरे ऊर्फ तात्या व युवा नेते स्वर्गीय प्रकाश कचरे यांनी शेतीला जोडव्यवसाय उद्योग असावा म्हणून उद्योग व्यवसायात पदार्पण केले आणि कचरे परिवार यांनी उद्योग-व्यवसायात गगन भरारी घेतलेली आहे. १९८८ साली कचरे परिवारातील स्व. रामहरी कचरे व स्व. प्रकाश कचरे यांनी माळशिरस येथील एसटी स्टँड समोर कचरे क्लॉथ सेंटर सुरू केले. माळशिरस शहरात उद्योग व्यवसायामध्ये तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून दोघांनी उत्तमरित्या व्यवसाय करून समाजामध्ये कचरे परिवार यांचे उद्योग व्यवसायात वेगळे स्थान निर्माण केले. कचरे परिवार यांच्याकडे २०१० साली हनुमान ऑटो सुरू केलेले होते. त्या क्षेत्रात उत्कृष्ट व्यवसाय केल्यानंतर २०१६ साली ईश्वरी मेडिकल सुरू केले. त्यानंतर २०२१ साली अविराज टायर्स व्यवसाय सुरू केला आणि आत्ता २०२२ मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कचरे हार्डवेअर सुरू केलेले आहे. त्यामध्ये बांधकाम साहित्य, सिमेंट, प्लंबिंग, मटेरियल, शेती उपयोगी साहित्य, ड्रीप साहित्य मिळणार आहे. कचरे परिवारातील विलास कचरे, हनुमान कचरे, सचिन कचरे, बाजीराव कचरे उद्योग व्यवसाय सांभाळत आहे. सर्वांना मार्गदर्शन मंत्रालयातील अपर सचिव गणेश कचरे यांचे असते.

कचरे हार्डवेअरचे उद्घाटन झाल्यानंतर अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, उप अभियंता श्री. डाके, अभियंता गोविंद कर्णवर, पाटील, माने, ॲड. दादासाहेब काळे मा. जि. प. सदस्य सातारा, उद्योजक अजित रासकर, ॲड. पांढरे सरपंच करकंब, सांगोल्याचे टि. डी. बंडगर, ह.भ.प. सागर बोराटे महाराज, सॅमसंग सुंदर रासपचे पंकज देवकाते पंढरपूर, राष्ट्रवादीचे परमेश्वर कोळेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. राम सिद यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng