नैसर्गिक उंची कमी असलेल्या बनसोडे परिवार यांनी कार्यकर्तृत्वातून समाजात उंची निर्माण केली.
वेळापूर ( बारामती झटका )
देशातील गरीब वंचित दुर्बल उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचे बळ देणारे, शिका व संघटित व्हा या संदेशाने बहुजनांचे कल्याण करणारे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, अध्यात्मिक आणि भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या सूत्रात बांधण्याचे काम करणारे देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचे काम करणारे बहु आयामी व्यक्तिमत्व, कायदेतज्ञ, घटना तज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार असणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कट्टर भीमसैनिक शिवाजी कृष्णा बनसोडे आणि बनसोडे परिवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दि. 14 एप्रिल 2022 रोजी गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ आयोजित केलेला होता. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित झालेल्या भीमसैनिकांना 365 दिवसापेक्षा हा दिवस सण-उत्सवापेक्षा मोठा वाटत असतो.
वेळापूर ता. माळशिरस येथील सर्वसामान्य कुटुंबामध्ये असणारे कृष्णा बनसोडे यांना बावडा ता. इंदापूर येथील सुभद्रा कांबळे धर्मपत्नी म्हणून लाभलेल्या होत्या. सुभद्रा आणि कृष्णा यांना शिवाजी व दिलीप दोन मुले, तीन मुली रतन यांना मुंबई येथील कांबळे परिवार, मालन यांना खुडूस कांबळे परिवार, सिंधू यांना कांबळे परीवार अशा परिवारामध्ये विवाह केलेले होते.
कृष्णा बनसोडे श्रीपुर फॅक्टरीमध्ये बॉयलर अटेंडंट म्हणून काम करीत होते. त्यांनी शिवाजी व दिलीप आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. शिवाजी यांच्या अंगामध्ये संघटन कौशल्य होते, कष्ट करण्याची तयारी जिद्द होती. शिवाजी यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीत गवंडी व्यवसाय सुरू केला. सदरच्या व्यवसायामध्ये काम करून हळूहळू ते बांधकाम कॉन्ट्रॅक्टर बनले. समाजामध्ये सर्वच कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असत. शिवाजी यांना राजकुमार एक मुलगा व दोन मुली त्यापैकी मोनिका मोरगाव येथील मोरे परिवार व ज्योती लासुर्णे येथील लोंढे परिवार यांच्या घराण्यांमध्ये विवाह लावून दिले आहेत. राजकुमार यांचाही विवाह लासुर्णे येथील लोंढे परिवारातील पूजा यांच्याशी झालेला आहे. बंधू दिलीप यांनाही पत्नी उषा विकी मुलगा, दोन मुली त्यापैकी आम्रपाली पिलीव येथील सातपुते परिवार, आणि पूनम वालचंद नगर येथील कांबळे परिवार असे विवाह झालेले आहेत. राजकुमार व पुजा यांना प्रसाद मुलगा प्रियांका, सानिया, प्रेरणा अशा तीन मुली आहेत.
समाजामध्ये वावरत असताना शिवाजी व दिलीप यांचे आपल्या वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर समाजामध्ये सामाजिक कार्य सुरू आहे. समाजामध्ये अनेक लोकांना चांगला सल्ला देऊन अनेकांचे संसार सुस्थितीत आणलेले आहे. सर्व जाती-धर्मांमध्ये बनसोडे परिवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिवाजी भाऊ यांची नैसर्गिक उंची कमी असेल परंतु त्यांनी सामाजिक कार्यातून समाजामध्ये आपली उंची वाढवलेली आहे.
राजकुमार बनसोडे यांनी आजोबा कृष्णा, वडील शिवाजी, चुलते दिलीप यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये राजकुमार यांनीसुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण सामाजिक कार्यात सहभागी होऊन केली आहे. उद्योग व्यवसाय यामध्येही प्रगती करून परिवाराचे आर्थिक हित जोपासले आहे. वेळापूर एसटी स्टँड वर प्रसाद शु मार्ट चप्पल चा व्यवसाय यशस्वीरित्या चालविलेला आहे. वेळापूर येथे जागा घेऊन सुसज्ज असे बांधकाम केलेले आहे. माणूस जन्माला आल्यानंतर सुखी संसारामध्ये मुलं-मुली, त्यांची लग्न, नातवंडे अशा परिवारात रममाण होत असतो.

प्रत्येक माणसाचे घराच स्वप्न असतं, बनसोडे परिवार यांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. राजकुमार यांनी घराला नाव आईवडिलांचे दिलेले आहे.
शिव – मंगल या वास्तूचा गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ दैवत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन समाजामध्ये बनसोडे परिवार यांनी वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng