कण्हेरच्या माने पाटील घराण्यातील युवराजांच्या नामकरण बारशाला कन्हेरसिध्दाच्या नगरीला गोकुळ नगरीचे स्वरूप…

ह.भ.प.अमोल सुळ महाराज मोरोची यांच्या नामकरण बारसे व वाढदिवस कार्यक्रमानिमित्त सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन.

कण्हेर ( बारामती झटका )

कण्हेर ता. माळशिरस येथील सौ. यशोदा व श्री. नामदेव श्रीपती माने पाटील यांचे नातू व सौ. मनिषा व श्री. गौतमआबा नामदेव माने पाटील यांच्या चिरंजीवाचे नामकरण बारसे समारंभ रविवार दि. 24/04/2022 रोजी सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमीत्ताने ह.भ.प. अमोल सुळ महाराज, मोरोची यांच्या सुश्राव्य कीर्तन व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी बाळाला शुभाशीर्वाद, कीर्तन सेवेचा लाभ आणि स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी मित्रपरिवार, नातेवाईक व कण्हेर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व समस्त ग्रामस्थ यांना उपस्थित राहण्यासाठी नम्र विनंती समस्त माने पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.


सौ. यशोदा व श्री. नामदेव श्रीपती माने पाटील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. परिस्थिती अतिशय बिकट व गरिबीची होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. पूर्वीच्या काळी मुलं ही देवाघरची फुलं, असे समजून पूर्वी हम दो हमारे दो शासनाच्या नियम नव्हता. त्यामुळे परिस्थिती गरिबीची असो किंवा श्रीमंतीची असो डझन, अर्धा डझन अपत्य ग्रामीण भागात असत. सौ. यशोदा व नामदेव यांना पहिले कन्यारत्न केशर प्राप्त झाले. केशर यांचा जयवंत मदने यांच्याशी विवाह लावून दिलेला होता. त्यांना दोन मुले एक मुलगी आहे. दुसरे अपत्य मुलगा यांना आजोबांचे नाव देण्यात आले. श्रीपती यांचा वैजयंती यांच्याशी विवाह लावून दिला. त्यांना रामदास व लक्ष्मण दोन मुले आहेत. तिसरे अपत्य हावसराव यांचा विवाह देवई यांच्याशी लावून दिलेला होता त्यांना शंकर, अशोक दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. चौथे अपत्य दत्तात्रेय त्यांचा विवाह संगीता यांच्याशी लावून दिलेला होता. त्यांना दोन मुली आहेत. पतीपत्नी दोघांचाही मृत्यू झालेला आहे. पाचवे अपत्य दिलीप त्यांचा विवाह शोभा यांच्याशी लावून दिलेला आहे. त्यांना दोन मुले वैभव, योगेश आहेत. सहावे अपत्य श्रीमंत यांचा विवाह मालन यांच्याशी झालेला होता. त्यांना विशाल मुलगा व एक मुलगी आहे. सातवे अपत्य उत्तम यांना आबाजी माने यांना दत्तक दिले. त्यांचा विवाह उज्वला यांच्याशी लावून दिलेला आहे. आहे. त्यांना विश्वजीत अजिंक्य दोन मुली आहेत. आठवे अपत्य गौतमआबा त्यांचा विवाह साळमुखवाडी येथील सुळ परिवारातील मनीषा यांच्याशी झालेला होता. नववे अपत्य एकनाथ यांचा विवाह सुमन यांच्याशी झालेला होता. त्यांना शुभम मुलगा व तीन मुली आहेत. दहावे अपत्य खशाबाई यांना रघुनाथ गोरड यांना दिलेले आहे. त्यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. अकरावे अपत्य जगन्नाथ उर्फ बाबासाहेब यांचा विवाह रेश्मा यांच्याशी झालेला आहे. त्यांना कीर्तिराज व अथर्व दोन मुले आहेत. बारावी अपत्य उलका यांचा विवाह तानाजी मोठे यांच्याशी केलेला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा आहे.

लहानपणापासून गौतमआबा यांना मित्रपरिवार संघटनकौशल्य गरीब परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी परिस्थितीवर मात करून उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतलेली आहे. त्यांना परिवारातील सदस्यांची नेहमी साथ मिळालेली आहे. कमी वयामध्ये गावच्या सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली. आबांनी मिळालेल्या संधीचं राजकारणात सोनं केलं. पंधरा वर्ष गावावर एक हाती सत्ता ठेवलेली होती. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दैदीप्यमान विजय मिळवून पंचायत समितीचे सदस्य झालेले होते. खडी क्रेशर व्यवसाय जोमात सुरू आहे. आबांच्या परिवारातील सर्व सदस्यांना अपत्य आहेत. लग्नाला वीस वर्ष झाली तरी आबांना अपत्य नव्हते. तरीसुद्धा आबा भावांच्या मुलावर मुलासारखे प्रेम करीत होते. माने पाटील परिवार व तालुक्यातील, जिल्ह्यातील मित्र परिवार नातेवाईक यांच्या मनामध्ये इच्छा होती. सर्वकाही आहे गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा समाजामध्ये मान मानतुक मात्र एका गोष्टीची उणीव होती पुत्र प्राप्तिची. गौतमआबांना पुत्र प्राप्ती व्हावी. गावचे जागृत देवस्थान कन्हेर सिद्धाचा कृपाशीर्वाद व आई वडिलांची पुण्याई यामुळे सौ. मनीषा व श्री. गौतमआबा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर माने पाटील परिवार व गौतमआबांवर प्रेम करणाऱ्या मित्र परिवार व नातेवाईक यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. माने पाटील परिवार यांनी पुत्रप्राप्तीचा आनंदोत्सव कन्हेर पंचक्रोशीतील आसपासच्या गावात घरोघरी जाऊन पेढे वाटले होते. पन्नास मोटरसायकली तीन दिवस घरोघरी जाऊन पेढे वाटप करत होते. गौतमआबा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भावांच्या व पुतण्याच्या सहकार्याने कष्टाच्या जीवावर व प्रामाणिकपणाने सर्वांचे संसार सुस्थितीत आणलेले आहेत.

कण्हेरच्या माने पाटील घराण्यातील वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आगमन झालेल्या युवराज याच्या नामकरण बारशाला कण्हेर सिद्धाच्या नगरीला गोकुळ नगरीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. गोकुळात कृष्णाचा नामकरण सोहळा संपन्न झाला, तशाच पद्धतीने आनंद उत्सव साजरा होणार आहे. मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमात पुतण्या पै. शुभम माने याचाही वाढदिवस आजच आहे. कमी वयामध्ये कुस्ती क्षेत्रात माने पाटील घराण्याचे नाव झळकवत असणारा पैलवान शुभम माने याचा ही वाढदिवस साजरा होणार आहे. कन्हेर पंचक्रोशीसह माळशिरस तालुक्यातील, सोलापूर जिल्ह्यातील गौतमआबा माने व माने पाटील परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. तालुक्यात आगळा वेगळा बारसे नामकरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय शैक्षणिक संकुलात श्री अनंतलाल दादा दोशी यांना मिळालेल्या समाजहितदक्षक ज्ञानदाता पुरस्काराबद्दल अभिनंदन सोहळा
Next articleGroup https://rimerestaurant.ca/ of Java

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here