कण्हेरच्या शेती क्षेत्र विकासासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मोठे योगदान – बाळासाहेब सरगर.

माळशिरस (बारामती झटका)

इस्लामपूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक या शाखेच्या माध्यमातून कण्हेर येथील शेती व्यवसायाच्या विकासासाठी मोठे योगदान मिळाले असून यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण बदलत चालले असल्याचे मत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी कण्हेर येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी सरपंच पोपट माने, सदस्य दतात्रय माने, सदाशिव देवकाते, शाखाधिकारी एस. डी. चव्हाण, आनंद शेंडगे, बँक मित्र ताई शेंडगे, दत्तू माने, प्रशांत थोरात, किरण काळे, रियाज शिकलगार, रेगुलर कर्जदार, खातेदार, ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना सरगर म्हणाले कि, या बँकेची शाखा इस्लामपूर येथे स्थापन झाल्यापासून कण्हेरच्या शेतकऱ्यांना शेती व शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी बँकेच्या माध्यमातून विविध कर्ज वाटप करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असणा-या गरजा जसे कि विहिर, पाईपलाईन पूर्ण झाल्याने शेतीमध्ये विविध बारमाही पिके घेणे शक्य झाले. यामुळे शेतक-यांचे अर्थकारण बदलण्यास मोठा फायदा झाला असून अनेक शेतक-यांना बँकेच्या कर्जमाफी, व्याजसवलत योजना, शासकीय अनुदान योजना, ट्रॅक्टर कर्ज अशा योजनेचा फायदा घेतला असून यासाठी बँकेकडूनहि वेळोवेळी सहकार्य मिळाले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकेच्या वतीने रेग्युलर कर्ज भरणा-या कर्जदारांचा सन्मान करण्यात आला. तसेच बँकेकडून देण्यात येणा-या विविध योजना बाबत या बँकेचे शाखाधिकारी एस. डी. चव्हाण यांनी माहिती देऊन जन जागृती केली. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद शेंडगे यांनी केले तर आभार बँक मित्र ताई शेंडगे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विकास कामातून जनतेची मने जिंकली तर, सामाजिक बांधिलकीतून लहान मुलाचे हृदय…
Next articleखुडूस येथे सेंट्रींग कामगाराची मुलगी आली 12 वी कला शाखेत संस्थेत पहिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here