माजी आ.रामहरी रुपनवर, उत्तमराव जानकर, मामासाहेब पांढरे, वस्ताद गोविंदतात्या पवार, काकासाहेब मोटे, बाळासाहेब लवटे, बाळासाहेब सरगर, नामदेव वाघमारे, संगीताताई मोटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
माळशिरस ( बारामती झटका )
कण्हेर ता. माळशिरस येथील श्री. एकनाथ निवृत्ती माने पाटील यांची नात व श्री. सुभाष एकनाथ माने पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. प्राजक्ता व तिरवंडी ता. माळशिरस येथील श्री. दत्तात्रेय आण्णा वाघमोडे पाटील व श्री. शिवाजी दत्तात्रय वाघमोडे पाटील यांचे द्वितीय चिरंजीव सारंग आणि श्री. तुकाराम निवृत्ती माने पाटील यांची नात व श्री. विजय तुकाराम माने पाटील यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. अंजली उर्फ प्रियांका आणि श्री. दत्तात्रय अण्णा वाघमोडे पाटील यांचे नातू व श्री. सुरेश दत्तात्रय वाघमोडे पाटील यांचे चिरंजीव संग्राम यांचा शुभविवाह गुरुवार दि. 17/02/2022 रोजी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस, अकलूज रोड 61 फाटा या ठिकाणी शाही शुभ विवाह सोहळा अनेक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदरच्या शाही विवाह सोहळ्यास विधान परिषदेचे माजी आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे वस्ताद गोविंदतात्या पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काकासाहेब मोटे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब लवटे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य सौ. संगीताताई मोटे, शिवसेना तालुकाप्रमुख नामदेव वाघमारे, दलित महासंघाचे उपाध्यक्ष उमाजी मिसाळ, भीमराव काळे (म्हाडा मुंबई कार्यकारी अभियंता), परिमल सावंत (ब्रु स्टार कंपनीचे साहेब), संदीप गुंजाळ (ब्रु स्टार कंपनीचे साहेब), मुंबई येथील कॉन्ट्रॅक्टर अशोक आतकरी, प्रकाश शेट्टी, नाना शेळके, रवी भोसले, दादा देवकाते, रवी प्रकाळे, रामचंद्र काळे, वामन होळ, चंद्रकांत काटे, शिवाजी जाधव, रामू कवालेकर, पुजारी साहेब, दत्तात्रय क्षीरसागर, नारायण जगदाळे, रवी पडवळ, मोरे साहेब, बापू खवळे, संजय सुळ (उद्योजक, मुंबई), भानुदास लकडे (उद्योजक, बारामती), महादेव नारनवर (मुंबई), बाबुराव घुले, ज्ञानदेव जानकर (बावडा),भांबचे सरपंच पोपटराव सरगर, धनाजी काळे (माजी सरपंच, भांब), पप्पू काळे (ग्रामपंचायत सदस्य, भांब), दामु मोरे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर नवनाथ येडगे, सुरज शिंदे, दामू मोरे, समाधान सकुंडे, प्रवीण येडगे, सुशांत, प्रसाद नांगरे (सातारा), अमोल गाढवे (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, वाई), हर्षराज माने (MNGL कॉन्ट्रॅक्टर, पुणे), नवनाथ येडगे (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, महूद), बालाजी येडगे (महूद), किसन मदने आदी मान्यवरांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मित्र परिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासकरून सुभाष माने पाटील यांच्यावर प्रेम करणारा मुंबई येथील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विधान परिषदेचे माजी आमदार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष माळशिरसचे ज्येष्ठनेते ॲड. रामहरी रूपनवर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने नववधू विवाहितांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा भव्य लग्नसमारंभाच्या व्यासपीठावरून दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर उपस्थित होते.
सदर विवाह सोहळ्याचे स्वागत माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ बाबासाहेब माने पाटील, सरपंच श्री. पोपट नारायण माने पाटील, रामभाऊ माने, बाजीराव माने, आप्पासाहेब टेळे, ज्येष्ठ नेते नामदेवराव काळे, होलार समाजाचे नेते नामदेव केंगार, अशोक ठवरे, राजाभाऊ माने आदींसह माने पाटील व वाघमोडे पाटील परिवारातील सदस्यांनी आलेल्या लोकांचे स्वागत व सत्कार केले. शाही विवाहसोहळा सर्वांना व्यवस्थित बसलेल्या ठिकाणावरून पाहता यावा असे स्टेजचे नियोजन केलेले होते. लग्न घाईगडबड, गोंधळ न होता वेळेवर विधीवत पार पडले. सदर शाहीविवाह सोहळ्याचे नियोजन माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील व माजी सरपंच सुभाष माने पाटील यांनी केले होते. सदर विवाह सोहळ्यावेळी शब्द सुमनाने स्वागत सौ. अर्चना शेंडगे मॅडम, सदाशिवनगर व श्रीनिवास कदम पाटील यांनी केले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng