चि.सौ.कां. प्राजक्ता माने पाटील व चिरंजीव सागर वाघमोडे पाटील आणि चि.सौ.कां. अंजली माने पाटील व संग्राम वाघमोडे पाटील यांचा शुभविवाह सोहळा.
माळशिरस ( बारामती झटका )
कण्हेर ता. माळशिरस येथील श्री. एकनाथ निवृत्ती माने पाटील यांची नात व श्री. सुभाष एकनाथ माने पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. प्राजक्ता व तिरवंडी ता. माळशिरस येथील श्री. दत्तात्रेय आण्णा वाघमोडे पाटील व श्री. शिवाजी दत्तात्रय वाघमोडे पाटील यांचे द्वितीय चिरंजीव सारंग आणि श्री. तुकाराम निवृत्ती माने पाटील यांची नात व श्री विजय तुकाराम माने पाटील यांची जेष्ठ सुकन्या चि.सौ.कां. अंजली उर्फ प्रियांका आणि श्री. दत्तात्रय अण्णा वाघमोडे पाटील यांचे नातू व श्री सुरेश दत्तात्रय वाघमोडे पाटील यांचे चिरंजीव संग्राम यांचा शुभविवाह गुरुवार दि. 17/02/2022 रोजी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय माळशिरस अकलूज रोड 61 फाटा या ठिकाणी संपन्न होणार आहे.

सदर विवाह सोहळ्याचे स्वागतोत्सुक जगन्नाथ ऊर्फ बाबासाहेब माने पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्ष व श्री पोपट नारायण माने पाटील सरपंच कण्हेर हे करणार आहेत. तरी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत, असे प्रेषक माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा नामदेव माने पाटील व कण्हेरचे माजी सरपंच सुभाष एकनाथ माने पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. घाईगडबडीत अथवा नजरचुकीने निमंत्रण पत्रिका देण्याचे राहून गेले असेल तर हेच निमंत्रण समजून शुभ विवाहास उपस्थित रहावे, असे माने पाटील व वाघमोडे पाटील परिवार यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng