पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी उपसरपंच नामदेव माने, उद्धव वाघमोडे, पोपट माने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…
माळशिरस ( बारामती झटका )
कन्हेर ता. माळशिरस येथील भारतीय जनता पक्षाचे माजी उपसरपंच नामदेव तुकाराम माने, उध्दव यशवंत वाघमोडे, पोपट मारुती माने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला असल्याने कन्हेर गावांमध्ये भारतीय जनता पक्षाला खिंडार पडले असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

कन्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत गौतमबाबा माने यांच्या पॅनेलने विरोधी पॅनलचा सुपडा साफ करून दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे. नूतन संचालकांचा सन्मान गावांमध्ये धूमधडाक्यात सुरू आहे. पोपट किसन माने व दाजी किसन माने यांच्या परिवाराने नूतन संचालक यांचा सत्कार व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सदरच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी उपसरपंच नामदेव तुकाराम माने, उद्धव यशवंत वाघमोडे, पोपट मारुती माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांमध्ये पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते बाजीराव माने, जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, हनुमंत काळे, बाबुशा माने, पांडुरंग महारनवर, खाशाबा बुधावले, धनाजी माने, शिवाजी माने सर, उमाजी मिसाळ, प्रकाश कुंभार, तात्यासो चव्हाण, कैलास काळे सर, विठ्ठल वाघमोडे, बंडू पाटील, भारत काळे, अंकुश शेंडगे, सतीश काळे, राजाभाऊ माने, अशोक ठवरे आदींसह नूतन संचालक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng