कण्हेर गावातील पै. कालिदास रुपनवर युवकाने वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी.


माळशिरस ( बारामती झटका )

कन्हेर तालुका माळशिरस येथील पैलवान कालिदास रूपनवर पाटील यांनी वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता आश्रम शाळेतील अनाथ मुलांना उपयुक्त असा कार्यक्रम आयोजित करुण सामाजिक बांधिलकी जपली आहे.
चिरंजीव पैलवान कालिदास भाऊ रुपनवर यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक 04/01 /20 22 रोजी आहे वाढदिवसानिमित्त एकशिव येथील गोविंद आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप दुपारी 4 वाजता करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय पैलवान कालिदासभाऊ रुपनवर पाटील मित्रपरिवाराने घेतलेला आहे.


माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यात पैलवान कालिदासभाऊ यांचे सामाजिक व राजकीय कार्य सुरू आहे त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत. कुस्ती क्षेत्रांमध्ये भरीव अशी कार्य केलेले आहे त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे माने बंधूंच्या सहकार्याने राजकीय घोडदौड सुरू आहे. आपल्या वाढदिवसाचा अनाथ मुलांना उपयोग व्हावा यासाठी शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाणसाला मरण यातनेच्या यमदूताच्या दारातून आणणाऱ्या देवदुताचा आनंदाने सन्मान.
Next articleमाळशिरस तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी निवडीत निकषांचा बोजवारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here