कण्हेर येथील श्रीमती यशोदा नामदेव माने पाटील अनंतात विलीन झाल्या….

पंचायत समितीचे सदस्य गौतमाआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्यासह सर्व बंधूंनी मुखाग्णी दिला.

माळशिरस (बारामती झटका)

कण्हेर ता. माळशिरस येथील श्रीमती यशोदा नामदेव माने पाटील यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. १४/३/२०२३ पहाटे अकलूज येथे दवाखान्यात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले होते. त्यांच्यावर कण्हेर येथील रानमळा येथे राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात सकाळी साडेआठ वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्यासह सर्व बंधूंनी मुखाग्नी दिला. यावेळी माळशिरस तालुक्यासह सोलापूर, सातारा, सांगली, मुंबई, पुणे येथील नातेवाईक व मित्रपरिवारांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील वस्ताद, मल्ल व कण्हेर पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आठ मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.

कण्हेर गावामध्ये यशोदाबाई व नामदेव माने पाटील यांना नऊ मुले व तीन मुली होते. त्यापैकी एक मुलगा वारलेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रपंच करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. काही महिन्यापूर्वी नामदेव माने पाटील यांचे दुःखद निधन झालेले आहे. वडिलांच्या दुःखातून सावरत असताना मातोश्री यशोदा यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सर्व मुलांना सुसंस्कार देऊन समाजामध्ये आदर्श अशी मुले घडविलेली आहेत. आठ भाऊ आणि तीन बहिणी एका वर्षाच्या आत आई-वडिलांना पोरके झालेले आहेत.

यशोदा माने पाटील यांच्यावर कण्हेर (रानमळा) येथे राहत्या निवासस्थाना शेजारी शेतामध्ये मंगळवार दि. १४/३/२०२३ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी अंतिम संस्कार केलेले असल्याने श्रीमती यशोदा माने पाटील अनंतात विलीन झालेल्या आहेत. त्यांच्या रक्षाविसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम गुरुवार दि. १६/३/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे. श्रीमती यशोदा माने पाटील यांच्या दुःखद निधनाने माने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ईश्वर त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआठ दिवसात पाच रुग्णांना साडेतीन लाखाची मदत
Next articleसर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा प्राध्यापक शिवाजीराव सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here