कण्हेर विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कण्हेरसिध्द शेतकरी विकास पॅनल व कण्हेरसिध्द परिवर्तन सहकार विकास पॅनल यांच्यात समोरासमोर लढत.

पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्या प्रतिष्ठेची लढाई तर, शंकरराव भानवसे, यशवंत माने, वसंतराव पाटील, भरतबापू माने, पोपट माने, धर्मराज माने यांच्या अस्तित्वाची लढाई.

कण्हेर ( बारामती झटका )

कण्हेर ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कण्हेर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन 2021-22 ते 2026 -27 सालाकरता सुरू झालेली आहे. कण्हेर सिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनल व कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनल यांच्यामध्ये समोरासमोर लढत लागलेली आहे. सेवा सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 1927 साली अस्तित्वात आलेली विकास सेवा संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना प्रथमच सेवा सोसायटीची निवडणूक लागलेली आहे.

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने व त्यांचे सहकारी यांनी कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार पॅनल उभा केलेला आहे तर माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव भानवसे, माजी सरपंच यशवंत माने, वसंतराव पाटील, भरतबापू माने, विद्यमान सरपंच पोपटराव माने, धर्मराज माने, नामदेव बर्वे, माने भानुदास, काळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेर सिद्ध शेतकरी विकास पॅनल केलेला आहे. गौतमआबा माने यांचे वीस वर्षापासून राजकारणातील सहकारी नामदेव केंगार विरोधी गटात उभे आहेत. निवडणुकी रंगात आलेली आहे.

गौतमआबा माने यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. तर शेतकरी विकास पॅनलच्या अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीवर आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे.

कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे सर्व साधारण खातेदार कर्जदार गटामध्ये दुधाळ दशरथ सिदु, काळे बलभिम विठ्ठल, माने बापू शंकर, माने दादासो सखाराम, माने धनाजी लक्ष्मण, माने धनाजी पोपट, माने रामदास शंकर, पाटील तुकाराम भगवान तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे चव्हाण तात्याबा जगू, काळे कैलास नाना, खताळ नामदेव मल्हारी, माने बाजीराव महादेव, माने ब्रह्मदेव यशवंत, माने महादेव रामचंद्र, माने शिवाजी विठ्ठल, शेंडगे दगडू अनंता हे उमेदवार आहेत.

कण्हेर सिद्ध शेतकरी विकास पॅनलचे अनुसूचित जाती जमाती गटामध्ये केंगार नामदेव आबाजी, तर कण्हेर सिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे मिसाळ अंबादास केसू हे उमेदवार आहेत.

कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे महिला प्रतिनिधी गटात देवकर लिलावती सोपान, माने रूक्मिणी रामदास तर गणेश सिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलच्या देवकाते अनिता बापू, ढगे सविता मच्छिंद्र या महिला प्रतिनिधी आहेत.
कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे भ.ज.वि.जा‌. विमाप्र गटामध्ये काळे मोहन मुरलीधर तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे वाघमोडे विठ्ठल पांडुरंग हे उमेदवार आहेत.

सेवा सोसायटीचे 480 सभासद आहेत. त्यामधील 317 सभासद मतदान करण्यास पात्र आहेत. गुरुवार दि. 26/4/2022 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कण्हेर येथे होणार आहे. 4 वाजले नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे श्री कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सोसायटीचे सचिव विजय कुलकर्णी हे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमिळालेले मानधन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना दान करणार – शाहीर राजा कांबळे
Next articleपुरंदावडे ग्रामपंचायतीच्या सौ. सुनीता पालवे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here