कण्हेर सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी प्रा. शिवाजीराव माने तर, व्हाईस चेअरमनपदी तात्यासो चव्हाण यांची निवड.

पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांची सोसायटीवर एकहाती सत्ता, विरोधकांचा उडविला धुरळा…

कण्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा झेंडा फडकला.

कण्हेर ( बारामती झटका )

कण्हेर ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत माळशिरस पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व तेरा जागांवर दैदीप्यमान विजय मिळवत विरोधकांचा धुराळा उडवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा झेंडा सेवा सोसायटीवर फडकला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त संचालकांची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी बैठक आयोजित केलेली होती.

कन्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदासाठी प्रा. शिवाजीराव विठ्ठल माने यांचे नाव बाजीराव माने यांनी सुचविले. याला कैलास काळे सर यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध चेअरमन पदाची घोषणा करण्यात आली.तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी तात्यासो चव्हाण यांचे नाव अर्जुन दत्तात्रय कुंभार यांनी सुचवले. याला विठ्ठल पांडुरंग वाघमोडे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.
चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी पंचायत समिती सदस्य गौतम बाबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे साहेब व सचिव भाऊसाहेब कुलकर्णी यांनी सहकार्य केले . यावेळी नूतन चेअरमन यांचे स्वागत पांडुरंग महानवर यांनी केले तर नूतन व्हाईस चेअरमन यांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य लहू जाधव यांनी केले.

सदर निवडीच्या वेळी माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासो माने, सोसायटीचे सर्व नवनियुक्त संचालक बाजीराव माने, कैलास काळे, विठ्ठल वाघमोडे, महादेव माने, नामदेव खताळ, ब्रह्मदेव माने, अर्जुन कुंभार, अंबादास मिसाळ, श्रीमती सविता ढगे, सौ. अनिता देवकाते, रमेश पाटील, हनुमंत काळे, देवीदास पाटील, पांडुरंग महारनवर, जगन्नाथ शिंदे, प्रकाश कुंभार, उमाजी मिसाळ, उद्धव माने, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय माने, सर्जेराव माने, खाशाबा बुधावले, उद्धव वाघमोडे, पोपट माने, माजी उपसरपंच नामदेव माने, राजेंद्र माने, अशोक ठवरे, अंकुश शेंडगे, नामदेव काळे, एकनाथ गुरव, भारत काळे, शंकर बोडरे, सतीश काळे, दाजी माने, दत्तू ढगे, धनाजी राऊत, विनोद गोसावी, बंडू पाटील, महादेव शिंदे, दादा चव्हाण, बापू माने, सुहास माने, महादेव करडे, कुमार धाईंजे, सचिन माने, महादेव सरगर, हनुमंत कुंभार, बाबू मिसाळ, सागर माने आदींसह सोसायटीचे सर्व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडद विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 26 उमेदवार आमने सामने.
Next articleसोलापूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते बालविवाह रोखणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here