माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांचे कट्टर समर्थक प्रा. शिवाजीराव माने यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झाली.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील कण्हेर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांचे कट्टर समर्थक प्राध्यापक शिवाजीराव माने यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झालेली आहे. कण्हेर सेवा सोसायटीवर चेअरमन प्रा. शिवाजीराव माने यांच्या रूपाने सुशिक्षित चेहरा गावच्या सोसायटीला मिळालेला आहे. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 13 जागा दैदिप्यमान संपादन करून विजयी झालेले होते.
कण्हेर सेवा सोसायटीची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. सर्व संचालक व गावातील नेते व कार्यकर्ते यांच्यामधून सर्वानुमते चेअरमन पदासाठी प्रा. शिवाजीराव माने व व्हाईस चेअरमन पदासाठी तात्यासो चव्हाण यांची नावे आलेली होती. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या बिनविरोध निवडी जाहीर झालेल्या आहेत.

प्राध्यापक शिवाजीराव माने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे शिक्षण एम.ए.बी.एड. झालेले आहे. सध्या गीताई प्रशाला मोटेवस्ती, भांबुर्डी ता. माळशिरस येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांची सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्यानंतर सोसायटीच्या सभासदांची व गावातील जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सोसायटीचा कारभार पारदर्शक व सभासदांचे हीच जोपासले जाईल, अशी खात्री सभासदांना व जनतेला असल्याने त्यांच्या निवडीवर कण्हेर पंचक्रोशीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
