कण्हेर विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कण्हेरसिध्द शेतकरी विकास पॅनल व कण्हेरसिध्द परिवर्तन सहकार विकास पॅनल यांच्यात समोरासमोर लढत.
कण्हेर ( बारामती झटका )
कण्हेर ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कण्हेर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन 2021 -22 ते 2026-27 सालाकरता निवडणूक सुरू झालेली आहे. कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनल व कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनल यांच्यामध्ये समोरासमोर लढत लागलेली होती. सेवा सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 1927 साली अस्तित्वात आलेली विकास सेवा संस्थेची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना प्रथमच सेवा सोसायटीची निवडणूक लागलेली होती. 317 मतदारांपैकी दहा मतदार मयत, चार नोकरीनिमित्त बाहेरगावी तर काही आजारी आहेत. त्यामुळे 302 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करून घेण्यामध्ये दोन्ही पॅनलची चुरस होती. आता उत्कंठा लागलेली आहे. निकालाची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.
कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे सर्व साधारण खातेदार कर्जदार गटामध्ये दुधाळ दशरथ सिदु, काळे बलभिम विठ्ठल, माने बापू शंकर, माने दादासो सखाराम, माने धनाजी लक्ष्मण, माने धनाजी पोपट, माने रामदास शंकर, पाटील तुकाराम भगवान तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे चव्हाण तात्याबा जगू, काळे कैलास नाना, खताळ नामदेव मल्हारी, माने बाजीराव महादेव, माने ब्रह्मदेव यशवंत, माने महादेव रामचंद्र, माने शिवाजी विठ्ठल, शेंडगे दगडू अनंता हे उमेदवार आहेत.
कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे अनुसूचित जाती जमाती गटामध्ये केंगार नामदेव आबाजी, तर कण्हेर सिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे मिसाळ अंबादास केसू हे उमेदवार आहेत. कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे महिला प्रतिनिधी गटात देवकर लिलावती सोपान, माने रूक्मिणी रामदास तर गणेश सिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलच्या देवकाते अनिता बापू, ढगे सविता मच्छिंद्र या महिला प्रतिनिधी आहेत. कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे भ.ज.वि.जा. विमाप्र गटामध्ये काळे मोहन मुरलीधर तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे वाघमोडे विठ्ठल पांडुरंग हे उमेदवार आहेत.
अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे श्री. कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सोसायटीचे सचिव विजय कुलकर्णी हे करीत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng