सोसायटीचे सभासद असो अथवा नसो, गटातील असो अथवा विरोधी गटातील समस्त कण्हेर ग्रामस्थांना आमंत्रण, मनपसंत भोजनाचे आयोजन
250 किलो बकऱ्याचे मटण, 500 किलो मासा, 1000 कोंबड्याची अंडी, शाकाहारी लोकांची स्वतंत्र व्यवस्था.
कण्हेर ( बारामती झटका )
कण्हेर ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार दैदीप्यमान फरकाने विजयी झाल्याबद्दल पार्टी प्रमुख व नूतन संचालकांनी सोसायटीच्या विजयाचा आनंद उत्सव मनपसंत स्नेह भोजनाने बुधवार दि. 04/05/2022 रोजी सायंकाळी सात वाजता कन्हेर येथे पंचायत समितीचे सदस्य सोसायटीच्या विजयाचे किंगमेकर गौतमआबा माने पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कन्हेर गावातील सोसायटीचा सभासद असो अथवा नसो, गटातील असो अथवा विरोधी गटातील, असा भेदभाव न करता समस्त कन्हेर ग्रामस्थांना मनपसंत भोजनाचे आमंत्रण दिलेले आहे. मोठी पाच बकरे 250 किलो मटन आहे. 500 किलो मासे, 1000 कोंबड्यांची अंडी हे सर्व मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी तर शाकाहारी लोकांसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मनपसंत मटन, मासा, अंडी आवडीप्रमाणे लोकांना मिळणार तर शाकाहारी लोकांचीही चांगली सोय केलेली आहे. कन्हेर पंचक्रोशीमध्ये शाकाहारी व मांसाहारी स्नेह भोजनाची चर्चा रंगली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng