कन्हेर (बारामती झटका)
कन्हेर येथील सरगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येक वर्गातून सदस्य निवड प्रक्रियेतुन निवडुन आले. यावेळी अपंग व मागासवर्गीय महिला सदस्य यांची निवड करण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्या कांता रुपनवर गटाला पाच तर दुसऱ्या गटाला चार अशा जागा मिळाल्या. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्या कांता रुपनवर व मारुती पिंजारी यांच्या गटाच्या वनिता काळे, शंकर सरगर, रूपाली शेंडगे, धनाजी शेंडगे, वनिता पिंजारी, रेश्मा शेंडगे सदस्य म्हणून निवडले तर वनिता काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर शंकर सरगर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
या निवडणूक प्रक्रियेचे काम मुख्याध्यापिका वसुंधरा मडके व सहशिक्षक हरिदास चौरे व संजय राठोड यांनी केले. यावेळी बाळासाहेब सरगर, आबासाहेब शेंडगे, राजेंद्र बर्वे, सचिन पिंजारी, प्रताप शेंडगे, नानासाहेब वाघमोडे, युवराज शेंडगे, पोपट शेंडगे, पिंटू शेंडगे, अर्जुन शेंडगे, अनिल बर्वे, रामदास काळे, राजेंद्र शेंडगे, राजेंद्र काळे, अमोल काळे, अंकुश शेंडगे, उत्तम शेंडगे, किसन पिंजारी, अमोल वाघमोडे, सचिन काळे, सुनील काळे, बापू शेंडगे, नाना काळे, अनिल पिंजारी, धनाजी काळे, पप्पू वाघमोडे, सागर वाघमोडे, तुकाराम शेंडगे, सोमा काळे, तानाजी पिंजारी, दत्तू शेंडगे, जगन्नाथ शेंडगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng