करमाळा अर्बन बँकेचे नूतन संचालक चंद्रकांत चुंबळकर यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सत्कार

करमाळा (बारामती झटका)

करमाळ्यातील सर्वात जुनी बँक म्हणून ओळखले जाणाऱ्या करमाळा अर्बन बँकेच्या संचालकपदी किल्ला विभागातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चुंबळकर यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचा सत्कार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, हिवरवाडीचे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, हिवरवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ, टेंभुर्णीचे प्रसिद्ध मंडप कॉन्ट्रॅक्टर संदीप वाघे, मंगेश गोडसे, मंजूर शेख, निलेश चव्हाण, मारुती भोसले, नागेश शेंडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत चुंबळकर म्हणाले की, कै. गिरीधरदास देवी यांच्या नेतृत्वाखाली अर्बन बँकेने नावलौकिक कमावलेला आहे. येणाऱ्या काळातसुद्धा सर्व अडचणीवर मात करून करमाळा अर्बन बँक पुन्हा एकदा करमाळा शहरातील नागरिकांच्या विश्वासाची बँक बनेल, असा विश्वास व्यक्त केला. बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयच्या नियमाप्रमाणे भाग भांडवल पूर्ण झाले असून वसुलीचे काम जोरात सुरू आहे. येणाऱ्या काळात अर्बन बँक करमाळा शहरवासीयांसाठी मदतीचा आधार ठरेल, असा विश्वास व्यक्त केला‌.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ चे आयोजन
Next articleलक्षवेधी बातमी : नातेपुते नगरपंचायतीच्या विकास कामांवर सात नगरसेवकांचा बहिष्कार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here