माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना पितृशोक.
करमाळा ( बारामती झटका )
करमाळा तालुक्यातील टाकळी चिंचोली गावातील जगन्नाथ गुळवे यांनी बुधवार दि. 18/01/2023 रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुभाष गुळवे यांचे ते वडील होते. त्यांच्यावर टाकळी येथील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन, तिसऱ्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/01/2023 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.
कै. जगन्नाथ गुळवे यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देऊन चांगले संस्कार केलेले होते. ते स्वतः धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांना समाजामध्ये आदराचे स्थान होते. त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी होती. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केलेले होते. थोरला मुलगा शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, दुसरा मुलगा माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहेत, तर धाकटा मुलगा सुभाष यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदावर काम केलेले आहे. सध्या सुभाष बारामती ॲग्रो शुगरचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच त्यांना चार नातू व तीन नाती आहेत, नातू इंजिनीयर, डॉक्टर, शेतकरी आहेत.
अशा सुसंस्कृत व समाजामध्ये प्रतिष्ठा असणाऱ्या गुळवे परिवार यांचा आधारवड हरपलेला असल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या दुःखातून गुळवे परिवार यांना सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng