करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पात 24 कोटी निधीची तरतूद, आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती.

कन्हेरगांव (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अर्थसंकल्पामध्ये करमाळा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 24 कोटी निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

2022 -23 या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख्याने रोपळे, केम, वडशिवणे, कंदर ते कन्हेरगांव ता. माढा प्रजिमा 12 सुधारणा करणे यासाठी 1 कोटी 90 लाख, मिरगव्हाण – अर्जुननगर – शेलगाव क – सौंदे – वरकटणे – कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे या रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाख, पांडे – शेलगाव क – साडे- घोटी -केम रस्ता प्रजिमा. 10 सुधारणा करणेसाठी नाबार्डकडून 1 कोटी 77 लाख , पारेवाडी – राजुरी- अंजनडोह – कोंढेज – निंभोरे – मलवडी – दहिवली- कनेरगाव – वेणेगाव रामा क्रमांक 9 ला जोडणारा प्रजिमा क्रमांक 4 सुधारणा करणे यासाठी 3 कोटी 25 लाख, कोर्टी – दिवेगव्हाण -पारेवाडी रेल्वे स्टेशन – केत्तुर 2 ते पोमलवाडी स्‍ता प्रजिमा 124 सुधारणा करणे यासाठी 2 कोटी 25 लाख, कुर्डूवाडी परंडा रस्ता रामा 210 सुधारणा करणे 2 कोटी 50 लाख, केम ढवळस पिंपळकुटे रस्ता प्रजिमा 14 सुधारणा करणे 2 कोटी 85 लाख, बोरगाव करंजे मिरगव्हाण कोळगाव निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे घोटी निंभोरे ते जेऊर रस्ता – 2 कोटी 85 लाख, ढवळस चोभे पिंपरी कव्हे रस्ता प्रजिमा 15 – 1 कोटी 90 लाख, कव्हे लहू म्हैसगाव ते रामा 145 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 16 – 1 कोटी 90 लाख असे एकूण 10 रस्त्यांच्या विकासासाठी 24 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते योजनेअंतर्गत मतदार संघातील साडे, दिल्मेश्वर, गुळसडी, सालसे, रावगाव, फीसरे, उपळवटे, महादेववाडी आदी 32 गावातील रस्त्यांसाठी 4 कोटी पेक्षा अधिक निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. याशिवाय करमाळा शहरांमध्ये टाऊन हॉल बांधणे, नगरपरिषद इमारतीचे बांधकाम करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे यासाठीही 10 कोटींहून अधिक निधीची तरतूद होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीचा प्रत्यय माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सामाजिक कार्यातून आला
Next articleशेतकऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज यांना भ्रष्टाचार विरोधी दिले निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here