इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व श्रीमती पद्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच बिनविरोध झाली. त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार सर्व कामगार बंधूंच्यावतीने जेष्ठ कामगारांच्या शुभहस्ते व कार्यकारी संचालक लोकरे साहेब, सर्व खाते व विभाग प्रमुख यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी कामगारांना गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले व निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी संचालक यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, मच्छिंद्र अभंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng