काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष सतीशनाना पालकर यांनी काँग्रेसची परंपरा जोपासली.

महात्मा गांधींचा पुतळा स्वच्छ करून, परिसर सुंदर व स्वच्छ करून गांधीगिरीने अभिवादन केले.

अकलूज ( बारामती झटका )

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अकलूज येथील महात्मा गांधी यांचा पुतळा स्वच्छ करून परिसर सुंदर व स्वच्छ करून महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गांधीगिरीने अभिवादन केलेले असल्याने भारतीय काँग्रेस आय पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष सतीशनाना पालकर यांनी काँग्रेस पक्षाची परंपरा जोपासली आहे.

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि ज्येष्ठ नेत्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व चेरब्स स्कूलच्या अध्यक्षा उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या सहकार्याने गिरझणी गावचे सुपुत्र सतीशनाना पालकर यांची राजकीय घोडदौड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सतीशनाना पालकर यांच्याकडे भारतीय काँग्रेस आय पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. अध्यक्षांची सुरुवातच अकलूजमध्ये महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीगिरी करत पुतळा व परिसर स्वच्छ करून काँग्रेस पक्षाची परंपरा जोपासलेली आहे.

सतीशनाना पालकर यांचे गिरझणी गाव आहे. गावामध्ये गेल्या 30 ते 35 वर्षापासून लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता आहे. बिनविरोध करण्याची परंपरा आजसुद्धा कायम आहे. सतीशनाना पालकर यांनी ग्रामपंचायतचे सरपंच पद सांभाळलेली आहे. त्या कालावधीमध्ये गावांमधील अनेक विकासाची कामे केलेली आहेत. अनेक योजना राबविल्या आहेत. गिरझणी गावाच्या विकासासाठी नेहमी सतीशनाना प्रयत्नशील असतात. सतीशनाना यांच्याकडे गेले दहा वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद आहे. त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पाच लाखाचे बक्षीस स्वकार्यातून पटकावलेले आहे. गावामधील एकही तंटा पोलीस स्टेशन येथे जात नाही. गावामध्ये शक्यतो वाद-विवाद होत नाहीत, जर झालाच तर आपापसात मिटवण्याची गावाची परंपरा आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेची जबाबदारी लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडे भविष्यामध्ये सक्षमपणे चालवतील, या उद्देशाने सहकार महर्षीनी दिलेली होती‌. महाराष्ट्रामध्ये जनसेवा संघटना सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. जीवात जीवमान असे तो जनतेची सेवा करू, या ब्रीद वाक्याने प्रेरित होऊन संघटनेचे काम जोरदार सुरू आहे. अशा संघटनेचे सतीश नानांना लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादाने माळशिरस तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सतीश नानांनी जनसेवा संघटनेची टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली असल्याने प्रतापगड येथील मोहिते पाटील परिवार यांचे विश्वासू अनुयायी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. माळशिरस तालुक्याच्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे देऊन पुन्हा एकदा मोठा विश्वास टाकलेला आहे. निश्चितपणे सतीशनाना पालकर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व महात्मा गांधी यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर येथे कोविड योद्धा सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीत लसीकरण संपन्न.
Next articleजिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आत्मदहन थांबले मात्र, न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार :- शिवाजीराव शंकर सूळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here