काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी – ज्ञानेश्वर पंचवाघ

अकलूज (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांना मारण्याबाबतचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना भाजपा युवा मोर्चा माळशिरस तालुका चिटणीस ज्ञानेश्वर पंचवाघ यांनी दिले आहे.

देशाचे पंतप्रधान यांना मारण्याबाबतचे वक्तव्य करणे हा देशद्रोह गुन्हा ठरत असून नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. नाना पटोले यांनी स्वबचावसाठी जो खुलासा केला आहे की मी गावगुंड मोदी बाबत बोललो आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा हा दावा देखील खोटा ठरला आहे. कारण पोलीस प्रशासनाने खुलासा केला आहे की मोदी नावाचा कोणताही गावगुंड अस्तित्वात नाही आणि आम्ही मोदी नामक कोणत्याही व्यक्तीला अटक केली नाही. त्यामुळे नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान यांनाच उद्देशून बोलले आहेत हे सिद्ध होत आहे. तरी त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी संपूर्ण देशवासीयांची भावना आहे. अशा आशयाचे निवेदन दिले आहे. जर कारवाई झाली नाही तर, लढा अजून तीव्र केला जाईल, असा इशाराही ज्ञानेश्वर पंचवाघ यांनी दिला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात स्वीकृत नगरसेवक निवडीच्यावेळी घोडेबाजार होण्याची शक्यता ?
Next articleमाळशिरस येथील बँक ऑफ इंडिया बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी खातेदारांचा विचार करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here