कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून लोकशाहीचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करू, मात्र उल्लंघन करणाऱ्यांचे दंडूकशाहीने स्वागत करू – पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड

तरंगफळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांची शांतता कमिटीची बैठक संपन्न

तरंगफळ ( बारामती झटका )

कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन न करता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक लढवावी. लोकशाहीचे पालन करणाऱ्यांचा सत्कार करू मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांचे दंडूकशाहीने स्वागत करून भविष्यात कोणत्याही निवडणुकीत सहभागी होता येणार नाही, अशा पद्धतीने आचारसंहितेचे व लोकशाहीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा तरंगफळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या कार्यकर्ते, नेते, उमेदवार आणि पोलीस प्रशासन यांच्या बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.

माळशिरस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तरंगफळ ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. यावेळी लोकप्रतिनिधी, थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार, ग्रामपंचायत सदस्य पदाचे सर्व उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, एएसआय झरे साहेब, हवालदार गायकवाड साहेब, पोलीस कॉन्स्टेबल रोकडे साहेब, चालक अन्सारी आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर ग्रामपंचायतचे थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार माणिक सुळे पाटील यांच्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ
Next articleWhat Is a Virtual Info Room?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here