काय राव ???… राहुलआप्पा तुमचा आमच्यावर भरोसा नाय का ? महाळुंगकर मतदारांचा सवाल.

राष्ट्रवादीचे पार्टी प्रमुख राहुल रेडे पाटील राष्ट्रवादीमधून प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 13 मधून नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात.

महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील महाळुंग नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, आरपीआय व अपक्ष असे निवडणुकीत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख राहुल कुंडलिक रेडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक 13 मधून नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरलेले असल्याने काय राव??.. राहुलआप्पा तुमच्या आमच्यावर भरोसा नाय का ? असा महाळुंगकर मतदारांचा सवाल उपस्थित होत आहे.

भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्थानिक आघाडी यांच्या प्रचाराचा शुभारंभ होऊन स्पीकरद्वारे प्रचारास सुरुवात झालेली आहे. प्रचाराच्या वाहनावर सर्व उमेदवारांचे बॅनर लावून प्रचारास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या गाडीवर बॅनर पाहिला असता नगरपंचायत निवडणुकीत दोन वार्डात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल प्रमुख राहुल कुंडलिक रेडे पाटील उभे असल्याने बॅनरवरील फोटो पाहिल्यानंतर दोन्हीही वार्डातील मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमांडवे गावच्या चौकाची शोभा हनुमान मंदिराने वाढली – अर्जुन दुधाळ
Next articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे तुकाराम देशमुख व भाजपचे विजय देशमुख यांची लक्षवेधी लढत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here