दुर्मिळ योगायोग… मातोश्री हौसाबाई वीस वर्षांपूर्वी सरपंच पदाच्या खुर्चीवर तर विसावा सरपंच मुलगा सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.
मेडद ( बारामती झटका )
मेडद तालुका माळशिरस ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नाथआबा भानुदास लवटे पाटील यांची अटीतटीच्या निवडणुकीत सरपंच पदी निवड झालेली आहे आजपर्यंत झालेल्या मिळत ग्रामपंचायतला नाथाआबाच्या रूपाने सर्वात वजनदार सरपंच मिळालेले आहेत आबांचे वजन 130 किलो आहे. दुर्मिळ योगायोग मेडद ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळत आहे मातोश्री सौ सवाई भानदास पाटील वीस वर्षापूर्वी 2002 साली सरपंच पदाच्या खुर्चीवर होत्या तर वीस वर्षांनी विसावा सरपंच मुलगा सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले आहेत.

मेडद ग्रामपंचायत 1953 साली अस्तित्वात आलेली आहे पहिले सरपंच १) गजानन देवराव केसकर,२) भाईचंद पानाचंद गांधी.३) शंकर दादा पाटील,४) गणपत शंकर महामुनी, ५) शंकर दादा पाटील, ६)अबू येसु जगताप,७) विठ्ठल नामदेव पाटील, ८)धर्मराज बहिरू लवटे,९) पांडुरंग धोंडीबा जगताप, १०)भानुदास चंद्रकांत झंजे,११) तुळशीराम बापू तुपे,१२) श्रीमंत केरू जगताप, १३) हौसाबाई भानदास पाटील,१४) आशाबाई महादेव तोरणे,१५) राजाराम कुंडलिक तुपे,१६) संगीता सचिन लवटे,१७) भगवान श्रीपती झंजे,१८) छबुबाई महिपती लवटे,१९) युवराज भीमा झंजे,२० नाथाआबा भानुदास लवटे पाटील असे मेडद गावचे सरपंच झालेली आहेत. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच युवराजतात्या झंजे एकमेव सरपंच आहेत बाकीचे सर्व सदस्य यांच्यामधून झालेले आहेत. मेडद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन वेळेस शंकर दादा पाटील सरपंच झालेले आहेत पहिल्या वेळेस 16 /9 /1956 ते 6/ 11/ 1956 एवढ्या कालावधीसाठी होते. वजनदार सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांना आठ महिन्याचा कालावधी मिळणार आहे वीस बावीस मध्येच निवडणूक होणार आहेत. मातोश्री हौसाबाई यांनी सरपंच पदाची वीस वर्षापूर्वी खुर्चीवर बसून गावचा कारभार केलेला होतं त्याच खुर्चीवर मुलाला सरपंच होऊन गावाचा कारभार करण्याची संधी मिळालेली आहे दुर्मिळ योगायोग असावा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng