काय सांगताय… संघर्षयोद्धा दमदार आमदार राम सातपुते यांचे ट्विटरवर 50 हजार फॉलोअर्स !!!

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या थेट जनतेतील संपर्कासह सोशल मीडियावर दांडगा जनसंपर्क

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांचे शिष्य व कट्टर अनुयायी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा मतदार संघातील जनतेशी थेट संबंध असून महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेर जनतेशी संबंध असून सोशल मीडियावर देखील दांडगा जनसंपर्क आहे. आमदार राम सातपुते यांच्या ट्विटरवर 50,000 फॉलोअर्स पाहिल्यानंतर काय सांगताय ? अशी म्हणण्याची वेळ टिकाकारांवर आलेली आहे.

संघर्षनायक राम सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तुत्वावर विद्यार्थी दशेपासून संघर्ष नेतृत्व वक्तृत्व कर्तुत्व या बळावर आजपर्यंतची राजकीय वाटचाल केलेली आहे. विद्यार्थी दशेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करीत असताना विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत अनेक वेळा आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय दिलेला आहे. आक्रमक भूमिका व सडेतोड विचार यामुळे वरिष्ठांची मर्जी व जबाबदारी सांभाळणारा युवा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात ख्याती निर्माण झालेली होती. त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती. त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात संघटन करून पक्ष वाढवण्यासाठी काम केलेले होते. भाजपमधील अनेक दिग्गज नेते देवेंद्रजी फडवणीस, चंद्रकांतदादा पाटील, श्रीकांतजी भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली आ. राम सातपुते यांचा संघर्षमय राजकीय प्रवास सुरू होता.

माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांना आमदार होण्याचा बहुमान मिळालेला होता.
आमदार राम सातपुते यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांनी आमदार पदावर विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडी सरकारला अनेकवेळा धारेवर धरले होते. आ. राम सातपुते माळशिरस विधानसभेपूरते मर्यादित नाहीत तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आपल्या कार्यातून सुपरीचीत आहेत. आ. राम सातपुते यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती. ते अनेक राज्यांचा दौरा करून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.

आ. राम सातपुते यांनी ट्विटर अकाउंट काढलेले होते. सध्या त्या अकाउंटवर पन्नास हजार फॉलोअर्स झालेले आहेत. ट्विटर अकाउंट असणारे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व नामांकित लोकांची अकाउंट असतात. आ. राम सातपुते यांच्या ट्विटर अकाउंटला अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय आजी-माजी मंत्री, महाराष्ट्रातील भाजपचे नेते व आजी-माजी मंत्री यांचा सहभाग असतो. आ. राम सातपुते यांनी एकादी घटना किंवा माहिती ट्विट केल्यानंतर खळबळ उडत असते. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाउंटपेक्षा ट्विटरला जास्त महत्त्व आहे. फेसबुकवर कोणाचीही अकाउंट असतात. समाजामध्ये एक आधुनिक म्हण प्रचलित आहे, फेसबुकवर हजार मित्रं मात्र, गावात विचारणारं नाही कुत्रं, असे बोलले जाते. मात्र ट्विटर सारख्या अकाऊंटवर सर्वसामान्य कुटुंबातील असणारा संघर्ष नायक लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या 50 हजार फॉलोअर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील गट व गण रचना अशी झालेली आहे, मोहिते पाटील गटाला 2 गट व 5 गण निवडून येतील अशी परिस्थिती आहे मात्र…
Next articleखासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत फलकाकडे लक्ष केंद्रित…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here