कारुंडे गावच्या उपसरपंचपदी सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर यांची नाट्यमयरित्या निवड.

कारुंडे गावच्या ग्रामदैवताच्या दरबारातील शब्द राजकीय मंडळींनी पाळला नाही मात्र, श्रीनाथ देवाने आपले सत्पन सोडले नाही.

माळशिरस ( बारामती झटका )

कारुंडे ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर यांची नाट्यमयरित्या निवडणुकीत विजय होऊन निवड झालेली आहे. कारुंडे गावच्या ग्रामदैवताच्या दरबारातील शब्द राजकीय मंडळींनी पाळला नाही मात्र, श्रीनाथ देवाने आपले सत्पन सोडले नाही, असा प्रकार उपसरपंच पदाच्या निवडीवेळी पाहावयास मिळालेला आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या कारुंडे गावाची श्री नाथाच्या जागृत देवस्थानामुळे वेगळी ओळख आहे. आजपर्यंत कारुंडे गावातील श्रीनाथ पॅनल व भैरवनाथ पॅनल या राजकीय पॅनलनी एकमेकांच्या विरोधामध्ये राजकारण केले होते. मात्र 2017 साली थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी श्रीनाथाच्या मंदिरामध्ये दोन्ही पॅनल एकत्र येऊन निवडणूक लढलेले होते. नाथाच्या दरबारामध्ये असा फॉर्म्युला ठरला होता, एका पॅनलचा सरपंच दुसऱ्या पॅनलचा उपसरपंच. त्याप्रमाणे श्रीनाथ पॅनल यांच्याकडे पहिल्यांदा सरपंच पदाची धुरा आलेली होती. त्यावेळेस लोकनियुक्त थेट जनतेतून सरपंच अमरशेठ जगताप श्रीनाथ पॅनलचे झालेले होते तर उपसरपंच भैरवनाथ पॅनलचे करण्यात आले होते. पहिल्या सरपंच व उपसरपंच यांचा अडीच वर्षाचा कालावधी ठरलेला होता. मात्र, कोरोना संसर्ग रोगामुळे थोडा उशीर झाला तरीसुद्धा ठरल्याप्रमाणे श्रीनाथ पॅनलचे सरपंच अमरशेठ जगताप यांनी राजीनामा दिला. रिक्त झालेल्या भैरवनाथ पॅनलच्या सरपंचपदी बिनविरोध श्रीमती बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांची निवड करून नाथाच्या दरबारात ठरल्याप्रमाणे निवड केलेली होती.

सरपंच भैरवनाथ पॅनलचा झालेला असल्याने उपसरपंच श्रीनाथ पॅनलचा असे नाथाच्या दरबारात ठरलेले असताना भैरवनाथ पॅनलच्या राजकीय मंडळींनी शब्द पाळण्याऐवजी उपसरपंच करण्याच्या हालचालीला वेग आला आणि सदस्य पळवापळवी सुरू झाली. श्रीनाथ पॅनलच्या सर्व सदस्यांनी ठरल्याप्रमाणे सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर यांचा उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीनाथ पॅनलच्या बायडाबाई रुपनवर यांना ठरल्याप्रमाणे भैरवनाथ पॅनलमधील एका सदस्याने मतदान केले होते. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली होती. जागृत देवस्थान नाथाच्या दरबारातील भैरवनाथ पॅनल यांचेकडून शब्द पाळला नसल्याने दोन्ही समसमान सदस्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि जागृत देवस्थान यांच्या कृपाशीर्वादाने श्रीनाथ पॅनलच्या सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर यांची चिठ्ठी निघून नाथाच्या आशीर्वादाने नाट्यमयरित्या त्या उपसरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. यावेळी सरपंच श्रीमती बायडाबाई ज्ञानदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा कर्चे, महेश मसुगडे, प्रमिला गोसावी, श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दादासो रुपनवर (भगत), श्री शंकर सहकारी साखर कारखाना संचालक रमेश जगताप, माजी सरपंच पंखेराव गायकवाड, ज्येष्ठ नेते विजयराव मस्कर, माजी सरपंच विजय गायकवाड, सुभाष भीमराव पाटील उर्फ एस. बी. पाटील, ज्येष्ठ नेते माधवराव जगताप, माजी उपसरपंच जगन्नाथ लोंढे, कारुंडे गावचे तंटामुक्ती माजी अध्यक्ष देविदास शिंदे, दिनकर मसुगडे, सुबोध शिंदे, गुलाब करे, संजय पाटील, तुषार पाटील, राजू मसुगडे, दादा सुकरे, विशाल गायकवाड, आनंदा साळुंखे, जयराम मस्कर, युवराज साळुंखे, भीमराव भुजबळ, संतोष गोसावी, माऊली मसुगडे, आप्पा पाटील, मुकींदा रूपनवर, संजय पवार, सुभाष रूपनवर, विशाल गायकवाड, नानासो रुपनवर, अर्जुन रुपनवर, संजय रुपनवर, राजेंद्र खाशाबा मसुगडे आदींसह अनेक गावातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते. नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला होता. त्यांना सहकार्य पोलीस पाटील विकास रुपनवर पाटील यांनी केलेले होते.

उपसरपंचपदी सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून वाजत-गाजत ग्रामदैवत श्रीनाथाच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गेलेले होते. कारुंडे ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदी महिलाराज आलेला आहे. विशेष म्हणजे बायडाबाई नावाला महत्त्व आलेले आहे ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बायडाबाई नावाच्या सरपंच व उपसरपंच झालेले आहे. विशेष म्हणजे सरपंच श्रीमती बायडाबाई ज्ञानदेव पाटील व उपसरपंच सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर सख्ख्या मामी-भाची आहेत. त्यामुळे कारुंडे गावच्या विकासामध्ये एकमेकींच्या हातामध्ये हात घालून श्रीनाथाच्या आशीर्वादाने गावचा विकास करतील, असा विश्वास कारुंडे गावच्या जनतेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगुरसाळे गावातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय पाणी वापर संस्था व पाटबंधारे विभाग नरमला.
Next articleमाजी सरपंच ७, सेवानिवृत्त ग्रामसेवक ५ व सेवानिवृत्त गटविकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here