कारुंडे येथे कृषि संजिवनी सप्ताह अंतर्गत क्षेत्रीय भेट व शेतकरी संवाद संपन्न

कारुंडे (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथे दि. 29/06/2022 रोजी कृषि विभागामार्फत कृषि संजिवनी अंतर्गत प्रगतशील शेतकरी सवांद व क्षेत्रीय भेट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग व कृषि विभागाच्या इतर योजनेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये पिक लागवड तंत्रज्ञान प्रचार व प्रसार, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा संतुलीत वापर, बियाणे बिजप्रक्रिया याविषयावर सविस्तर मार्गदर्शन श्री. सचिन दिडके कृषि सहाय्यक यांनी केले. तसेच पंतप्रधान सुक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया उद्योग, मुल्य साखळी बळकटीकरण, शेतीपुरक व्यवसाय, शेतकरी गट, महिला सक्षमीकरण याविषयावर मार्गदर्शन श्री. कुलदीप ढेकळे यांनी केले. एकात्मिक किड व्यवस्थापन, निर्यातक्षम फळे व भाजीपाला, कृषक मोबाईल अॅपचा वापर, नरेगा फळबाग लागवड याविषयावर मार्गदर्शन श्री विजयकुमार कर्णे यांनी केले महाडिबीटीवरील योजना-सुक्ष्म सिंचन, कृषि यांत्रिकीकरण, शेततळे, कांदाचाळ, फळपिक विमा, शेतकरी अपघात विमा या सर्व योजना याविषयावर सविस्तर मार्गदर्शन श्री. उदय साळुंखे कृषि पर्यवेक्षक यांनी केले.

सदर कार्यक्रमामध्ये श्री. मारुती नामदेव शिंदे यांच्या सुक्ष्म सिंचनावर केलेल्या गादी वाफ्यावरील टोकण पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाच्या प्रक्षेत्रावर शेतकरी भेट व शेतकरी संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सुक्ष्म सिंचनावर केलेल्या गादी वाफ्यावरील टोकण पद्धतीने केलेल्या सोयाबीनची पाहणी करण्यात आली व तसेच पाने खाणा-या अळीचे निरीक्षणे घेण्यात आली व त्यावरील एकात्मिक उपाययोजना यावर शेतकरी परिसंवाद घेण्यात आला. अशा पद्धतीने गावांमध्ये सोयाबीन लागवडीचे प्रमाण वाढत असल्याचे प्रगतशील शेतकरी श्री. पंकेराव गायकवाड यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी श्री. उदय साळुंखे कृषि पर्यवेक्षक, श्री. कुलदीप ढेकळे आत्मा, श्री. सचिन दिडके कृस, गावचे सरपंच बायडाबाई पाटील, नागनाथ शिंदे, प्रशांत सरक, तेजस शिंदे, भारत मसुगडे, शंकर शिंदे, पंकेराव गायकवाड, मारुती शिंदे, ब्रम्हा गायकवाड प्रगतशील शेतकरी, सौ. वनिता शिंदे, सुषमा गायकवाड, महिला शेतकरी, सुभाष सुळ कृषिमित्र व गावचे कृषि सहाय्यक श्री. विजयकुमार कर्णे उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुवर्णसंधी… माळशिरस शहरात ओंकार कलेक्शनमध्ये फक्त 999 रुपयेमध्ये 3 जीन्स
Next articleवेळापुरात शिवकृपा कृषी सेवा केंद्राचा धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात उद्घाटन समारंभ संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here