कारुंडे विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी सुर्यकांत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पोपट रुपनवर यांची निवड

गावातील ज्येष्ठ मंडळी व तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्याने सोसायटीची यशस्वी वाटचाल सुरू ठेवू – नुतन चेअरमन सुर्यकांत पाटील.

संस्थेची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना चेअरमन व व्हाईस चेअरमन संचालक मंडळ पदाची बिनविरोध परंपरा कायम.

कारूंडे ( बारामती झटका )

कारुंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची रविवार दि. 29/05/2022 रोजी अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करण्यात आल्या आहेत. सर्वानुमते बिनविरोध चेअरमन पदी सूर्यकांत विठ्ठल पाटील उर्फ दादा व व्हाईस चेअरमन पदी पोपट नामदेव रूपनवर यांची निवड करण्यात आली आहे. कारूंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कारुंडे ता. माळशिरस या संस्थेची सन 2021-22 ते 2026-27 पंचवार्षिक निवडणुकीसाठी व्यवस्थापक समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध झालेल्या होत्या.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात पाटील सूर्यकांत विठ्ठल, पाटील तानाजी सायाप्पा, पवार अशोक श्रीरंग, पवार दीपक रघुनाथ, शिंदे सचिन भास्कर, रुपनवर मोहन मच्छिंद्र, वाघमोडे शहाजी शंकर, गोसावी दत्तात्रय लक्ष्मण, महिला प्रतिनिधी गटात रुपनवर सुभद्रा राघू, जानकर अरुणा गजानन, अनुसूचित जाती जमाती गटात खिलारे तुकाराम दशरथ, इतर मागास प्रवर्ग गटात रानगट दादा किसन, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात रुपनवर पोपट नामदेव अशा तेरा नवनियुक्त संचालकांच्या बिनविरोध निवड 26/04/2022 रोजी झालेल्या होत्या.

कारूंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष काळजीवाहू चेअरमन शिवाजी अण्णा रुपनवर पाटील, कारुंडे गावचे जेष्ठ माजी सरपंच व माजी चेअरमन हनुमंतराव पाटील, माजी चेअरमन सुभाष पाटील, लोकनियुक्त थेट जनतेतील माजी सरपंच अमरशेठ जगताप, माजी चेअरमन भास्कर शिंदे, उद्योजक मोहनराव राघू रुपनवर, युवा नेते अमोल ज्ञानदेव पाटील, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य महादेव अण्णा रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य कैलास गायकवाड, भारत नामदास, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष इंद्रजीत रुपनवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस तुषार पाटील, ग्रामसेवक मोरे भाऊसाहेब, संस्थेचे सचिव श्री. ज्ञानदेव हाके यांच्यासह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खास निवडीसाठी आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, धानोरे गावचे सरपंच जीवन जानकर, फडतरी गावचे चेअरमन अर्जुन दादा रुपनवर, कोथळी गावचे चेअरमन गणपत माने, यांच्यासह पोलीस प्रशासनातील सूर्यकांत पाटील यांच्यासोबत काम केलेले आजी-माजी पोलिस प्रशासनातील अधिकारी यांची खास उपस्थिती होती.

संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात दि. 05/06/1925 सालची आहे. संस्थेची उलाढाल सव्वा कोटीच्या आसपास आहे. संस्थेची 100% वसुली असते. सभासदांना लाभांश वाटप केला जातो. संस्थेचे भांडवल 28 लाख रुपये आहे. यावेळी मावळते चेअरमन शिवाजी आण्णा रुपनवर पाटील यांनी बिनविरोध चेअरमन सूर्यकांतदादा पाटील यांचा सन्मान केला. उपस्थित सर्व मान्यवर व संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ, आजी माजी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

नूतन चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर सांगितले की, संस्थेची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. अशावेळी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे आलेली असल्याने माझे भाग्य समजतो. गावातील ज्येष्ठ मंडळी व तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्याने मला संधी मिळालेली आहे. संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू ठेवू सभासदांचे व शेतकऱ्यांचे हित जोपासले जाईल. संस्थेच्या स्थापनेपासून बिनविरोध चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाची परंपरा शतकाकडे वाटचाल सुरु असताना सुद्धा गावातील सर्व नेतेमंडळी व सभासद यांनी बिनविरोध परंपरा कायम राखलेली असल्याबद्दल नवनियुक्त चेअरमन सूर्यकांत विठ्ठल पाटील उर्फ दादा यांनी सर्वांचे आभार मानले.

निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांनी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतीषबाजी करत गुलालाची उधळण केली. हलगी व डपडीच्या वाद्यांमध्ये वाजत गाजत ग्रामदैवत श्री भैरवनाथ व गावातील देव देवतांचा आशीर्वाद घेण्याकरिता सर्व मान्यवर मंडळी रवाना झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचांडाळ चौकडी फेम ह.भ.प. भरत शिंदे महाराज यांचे युवा उद्योजक संजय रुपनवर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.
Next articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मुंबई येथे उत्साहात साजरी होणार – युवा नेते ॲड. प्रशांत रुपनवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here