कारुंडे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करण्यात येणार…

कारूंडे विकास सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी सूर्यकांत विठ्ठल पाटील उर्फ दादा यांची निवड होण्याची दाट शक्यता.

कारूंडे ( बारामती झटका )

कारुंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची रविवार दि. 29/05/2022 रोजी अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सोसायटीचे मावळते चेअरमन शिवाजी आण्णा रुपनवर पाटील, कारूंडे गावचे माजी सरपंच व माजी चेअरमन हनुमंतराव पाटील, माजी चेअरमन सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करण्यात येणार आहेत. सर्वानुमते चेअरमन पदी सूर्यकांत विठ्ठल पाटील उर्फ दादा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असून सूर्यकांतदादा पाटील यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.

कारूंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कारुंडे ता. माळशिरस या संस्थेचे सन 2021-22 ते 2026-27 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी व्यवस्थापक समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध झालेल्या होत्या.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात पाटील सूर्यकांत विठ्ठल, पाटील तानाजी सायाप्पा, पवार अशोक श्रीरंग, पवार दीपक रघुनाथ, शिंदे सचिन भास्कर, रुपनवर मोहन मच्छिंद्र, वाघमोडे शहाजी शंकर, गोसावी दत्तात्रय लक्ष्मण, महिला प्रतिनिधी गटात रुपनवर सुभद्रा राघू, जानकर अरुणा गजानन, अनुसूचित जाती जमाती गटात खिलारे तुकाराम दशरथ, इतर मागास प्रवर्ग गटात रानगट दादा किसन, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात रुपनवर पोपट नामदेव अशा तेरा नवनियुक्त संचालकांच्या बिनविरोध निवड दि. 26/04/2022 रोजी झालेल्या होत्या.

कारूंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष काळजीवाहू चेअरमन शिवाजी अण्णा रुपनवर पाटील, कारुंडे गावचे माजी सरपंच व माजी चेअरमन हनुमंतराव पाटील, माजी चेअरमन सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव श्री. ज्ञानदेव हाके यांनी पारदर्शक कारभार करून सभासदांचे हित जोपासत आहेत. संस्थेची उलाढाल सव्वा कोटीच्या आसपास आहे. संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1925 सालची आहे. संस्थेची 100% वसुली असते. सभासदांना लाभांश वाटप केला जातो. संस्थेच्या इमारतीसाठी चौदा लाख रुपयाचा निधी उपलब्ध आहे. शिवाजी आण्णा रुपनवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांतदादा पाटील संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा समर्थपणे सांभाळत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असा नवनियुक्त संचालक व सभासदांना विश्वास आहे. म्हणून सूर्यकांत दादा पाटील यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी – कल्याणी वाघमोडे
Next articleपुरंदावडे विकास सेवा सोसायटीच्या मित्र सहकार विकास पॅनलचा प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here