कारूंडे येथे श्रीनाथ यात्रा उत्सवाचे भव्य आयोजन

कारूंडे (बारामती झटका)

कारूंडे ता‌. माळशिरस येथे श्रीनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समस्त ग्रामस्थ कारूंडे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मंगळवार दि. ११/४/२०२३ रोजी हळदी, गुरुवार दि. १३/४/२०२३ रोजी रात्री ९ वाजता देवाचे लग्न होणार आहे.

तसेच शुक्रवार दि. १४/४/२०२३ रोजी महानैवेद्य व रात्री ८ वाजता नारायण गाव येथील मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे.

शनिवार दि. १५/४/२०२३ रोजी पहाटे ५ वा. देवाचा गुलाल व छबिना निघणार आहे. तसेच दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानाचे समालोचन धनाजी मदने हे करणार आहे. यामध्ये इनाम रुपये १ लाख ७५ हजार रुपयांसाठी लढती होणार आहेत.

तरी जास्तीत जास्त भाविकभक्तांनी व ग्रामस्थांनी या यात्रेस उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपळे येथील प्रा. सौ. वासंती कुलकर्णी दुःखद निधन
Next articleपिसेवाडी येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here