कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची घेतली सदिच्छा भेट

मुंबई (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध विकासकामांविषयी सखोल चर्चा केली.

फलटण हे महाराष्ट्रातील एक प्राचीन शहर असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सासर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असून येथील पावनभूमीला श्रीरामांचे पदस्पर्श झाले आहेत. फलटणला महानुभाव पंथांची दक्षिण काशी या नावाने ओळखले जाते. फक्त एवढेच नाही तर हरिबुवा महाराज, संत उपळेकर महाराज यांची ही कर्मभूमी आहे‌. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील फलटण मध्येच असते.

आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी राजमार्ग हा एक महत्त्वपूर्ण रस्ता बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर पालखी मार्ग मालथन ते उंबरेश्वर चौक, पचबत्ती चौक, श्रीराम मंदिर, गजानन चौक, महात्मा ज्योतिराव फुले चौक, मालोजीराजे पुतळा ते गिरवी नाका, पालखी चौक ते एअरपोर्ट पर्यंत सर्व क्षेत्र पालखी मार्गाच्या अंतर्गत येत आहे. या महत्वपूर्ण तीर्थस्थळाचे महत्व जाणता या रस्त्याचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. एअरपोर्ट पासून नाना पाटील चौक पर्यंत, रिंग रोडच्या दोन्ही बाजूंसह एअरपोर्ट गिरवी नाका, डीएड चौक, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच क्रांतिवीर नाना पाटील चौक या रस्त्यांचे मजबूतीकरण व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. या रोडवर आणि सगळ्या चौकांना रंगरंगोटी करून येथे पौराणिक कथांच्या संबंधित सुंदर चित्र बनवले पाहिजेत आणि हे पूर्ण रस्ते पक्के केले पाहिजेत. या रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याकरता जवळपास ८० करोड रुपये खर्च होणार आहे. फलटण शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते परंतु, हायवे पासून शहरापर्यंत रस्ते तसेच शहरातील बायपास रस्ते दोन्ही प्रस्तावित डीपीआर च्या अंतर्गत येत नाहीत. हे दोन्ही रस्ते डीपीआरच्या अंतर्गत घेऊन हे रस्ते बनवावेत, अशी अपेक्षा समस्त वारकरी तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेची आहे.

तरी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या फलटणला प्राथमिकतेच्या आधारावर सुशोभीकरण व योजनाबद्ध पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टीने निर्देश जारी करण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याविषयी देखील चर्चा करण्यात आली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअंधश्रद्धेला फाटा देऊन शिवधर्म पद्धतीने केला तिसरा
Next articleकरमाळा तालुक्यातील जगन्नाथ गुळवे यांनी शंभराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here