कार्यसम्राट, डॅशिंग, कार्यतत्पर, लोकप्रिय दमदार आमदाराच्या कार्याची चर्चा होतेय, मग अपघाताची चर्चा तर होणारच.

सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सेवेतून सर्व अवयवांची विनामूल्य सेवा करणारे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या गाडीचे ३ टायर तुटून सुद्धा आमदारासह कोणाच्याच केसालासुद्धा धक्का नाही.

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट, डॅशिंग, कार्यतत्पर, दमदार आमदार राम सातपुते यांच्या कार्याची चर्चा दररोज होत असते. मग अपघाताची सुद्धा चर्चा होणारच‌. मात्र आमदार राम सातपुते यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करून अनेक दिवसांपासून शरीराचे अवयव निकामी अथवा दुखापत झालेले हात, पाय, मणका, हृदय अशा अनेक अवयवांच्या रोगांचे मोफत उपचार करून सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद घेतलेले लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या गाडीला ट्रॅक्टर आडवा आल्याने अचानक अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे तीन टायर फुटून गाडी बाजूच्या शेतात तीनशे फूट फरपटत गेली. तरीसुद्धा गाडीमधील आमदार राम सातपुते, स्वीय सहाय्यक, चालक, बॉडीगार्ड व साथीदार यांच्या कोणत्याही अवयवाला नाही तर, केसालासुद्धा धक्का लागलेला नाही. पुणे-पंढरपूर रोडवरील वेळापूर येथे झालेल्या अपघातामध्ये फक्त गाडीचा अपघात झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते मतदारसंघातील लोकांची पुणे-मुंबई येथील कामे आटोपून मतदार संघात जनतेच्या सुखा-दुःखात सहभागी होण्याकरता शुक्रवार दि‌. 20/05/2022 रोजी सकाळपासून कार्यक्रमाच्या दौऱ्याला सुरुवात झालेली होती. दहा ठिकाणी भेटीगाठी करून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या निरानरसिंहपूर येथील कार्यक्रमासाठी जाणार होते. चार ठिकाणच्या भेटी आटपून पुणे पंढरपूर रोडवरून तांदूळवाडी येथील शुभ कार्यास भेट देण्याकरता जात असताना दुपारी एकच्या सुमारास रस्ता मोकळा असल्याने 120 च्या स्पीडने गाडी भरधाव जात असताना ट्रॅक्टर अचानक आडवा आल्याने ट्रॅक्टर व समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली यांना वाचविण्यासाठी गाडी बाजूला घेत असताना डीव्हायडरवर जोरात गाडी आपटली. समोरील दोन टायर फुटले. टायर फुटल्याने गाडी उडाली. नंतर तिसरा टायर फुटला आणि गाडी फरपटत तीनशे मीटर पुढे गेलेली होती.

सुदैवाने चार फुटावर खोल खड्डा होता. त्याच्या बाजूला गाडी मातीमध्ये रुतून बसली आणि पुढील सर्व अनर्थ टळलेला होता. गाडीमध्ये आमदारांसह चार व्यक्ती असताना गाडीचा मोठा अपघात होऊन टायर फुटले तरीसुद्धा कोणालाही साधे खरचटले सुद्धा नाही.


लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात झाला, बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी आमदार राम सातपुते यांना फोन करून तब्येतीची चौकशी केली असता त्यांनी श्री पांडुरंग रुक्मिणी यांच्या वाटेवर श्री अर्धनारी नटेश्वराच्या कृपाशीर्वादाने तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे गाडी मधील कोणाला काही झाले नाही.
लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे विद्यार्थी दशेपासून संघर्षमय जीवन आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना वीस रुपये पगार दिला जात होता. यावर राम सातपुते यांनी आवाज उठविला, विद्यार्थ्यांचे संघटन केले, आंदोलन केले, आणि विद्यार्थ्यांना वीस रुपयावरून पस्तीस रुपये पगार झाला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केलेली आहे. राम सातपुते यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आठ ते दहा वर्ष घरदार सोडून सतत जनजागृती आंदोलन, मोर्चे, व्याख्यान, शिबिर अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले होते.


भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त आणि आई वडिलांचे आशीर्वाद यामुळे माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी होण्याचा त्यांना बहुमान मिळालेला होता. आयुष्यामध्ये संघर्षमय जीवन जगत असताना गरिबी जवळून पाहिलेली होती. त्यामुळे आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी कामास सुरुवात केली. सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी वेळोवेळी विधानभवन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व अन्य कार्यालयांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलने, मोर्चे काढून शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रश्न, खताचा प्रश्न, रेशन दुकानचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न असे अनेक सार्वजनिक प्रश्न सोडवलेले आहेत. तालुक्यामध्ये अनेक गोरगरीब लोक आहेत. घरातील व्यक्तींचा दवाखान्याचा खर्च करण्याची ऐपत नाही, अशा लोकांना आमदार राम सातपुते यांनी पुणे-मुंबई येथे घेऊन जाऊन हात, पाय, मणका, हृदय अशा अनेक लोकांची मोफत ऑपरेशन करून गोरगरिबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांची सेवा केली. भीषण अपघातमध्ये गाडीचे तीन टायर फुटले मात्र, गाडीमधील कोणालाही इजा झालेली नाही.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाढत्या महागाईमुळे श्रीलंका, पाकिस्तानसारखी भारताची वाटचाल सुरू – रविकांत वरपे
Next articleइंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून लाकडी निंबोडी रेंगाळलेली योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं, राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांची भूमिका योग्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here