‘कार्य हीच ओळख’ फाउंडेशनचे विश्वस्त, निसर्गमित्र सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत…

उंडवडी (बारामती झटका)

मागील अनेक वर्षापासून सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून दोन गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू तसेच त्या घरातील लहान मुलांना शालेय साहित्य दिले जाते. आज वाढदिवसानिमित्त उंडवडी कडेपठार येथील अशाच एका गरजू व गरीब कुटुंबाल जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास मनाशी बाळगुन सागर जाधव निसर्गसेवा करत आहेत. ‘कार्य हीच ओळख’ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या उंडवडी कडेपठार येथील वृक्षारोपणाच्या ठिकाणी श्रमदानासाठी सागर एका आठवड्यातून किमान ४ वेळा बारामती येथून १८ किलोमीटर येत असतात. वृक्षारोपणाच्या ठिकाणापासून एकदम हाकेच्या अंतरावर आणि नजर गेली की सहज दिसून येणारे एका कुटुंब, मोडक्या-तोडक्या पत्र्याच्या साध्या घरात राहत असल्याचे ते पाहत होते. त्या कुटुंबांची पूर्ण माहिती घेतली आणि ठरवलं कि, वाढदिवसानिमित्त या कुटुंबाला मदत करायची. आज वाढदिवसानिमित्त या कुटुंबाला साधारणपणे ४ महिन्याहून अधिक दिवस पुरेल अश्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सागर जाधव यांनी केलेल्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. निसर्गसेवेच्या आणि सामाजिक बांधिलकिच्या कार्याला सलाम..

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राष्ट्रवादी किसान सेलची मागणी.
Next articleएसटी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासंदर्भात सकारात्मक विचार करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here