कालकथित श्रीमती अनुसया तात्यासाहेब काले यांचे प्रथम पुण्यस्मरण.

तात्यासाहेब मनोहर काले उर्फ टि. एम. काले यांच्या धर्मपत्नी, ॲड. अविनाश व प्रकाश काले यांच्या मातोश्री

अकलूज ( बारामती झटका )

अकलूज ता. माळशिरस येथील आंबेडकरी चळवळीतील वैचारिक नेतृत्व असलेले पंढरपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक रिपब्लिकन पक्षाच्या वतीने लढवणारे ज्येष्ठ नेते तात्यासाहेब मनोहर काले उर्फ टिएम काले यांच्या धर्मपत्नी कालकथित श्रीमती अनुसया तात्यासाहेब काले यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि. 05/04/2022 रोजी दुपारी 12 वाजता अकलूज येथील राहत्या घरी होणार आहे. आंबेडकर चळवळीतील विचारवंत लेखक पत्रकार ॲड. अविनाश काळे व सामाजिक राजकीय चळवळीतील प्रकाश काले यांच्या मातोश्री आहे.

तात्यासाहेब काले यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील निलंगा आहे. उद्योग व्यवसायानिमित्त अकलूज येथे आलेले होते. सुरुवातीस गवंडी काम करत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची व कार्याची संपूर्ण माहिती त्यांनी घेतलेली होती. दलित, शोषित वंचित, बहुजन उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कार्य केलेले होते. सामाजिक राजकीय लढा दिलेला होता. माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या बरोबरीने माळशिरस तालुक्यातील समाजकारण, राजकारण केलेले होते. राजकारणाचा दांडगा अभ्यास होता. पंढरपूर लोकसभा मतदार संघातून तीन वेळा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली होती. प्रतिकूल परिस्थितीत अनुसया यांनी आपल्या पतीच्या कार्यामध्ये बरोबरीने साथ दिलेली होती. अविनाश आणि प्रकाश यांच्यावर सुसंस्कार केलेले होते. पतीच्या निधनानंतरही दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचे संस्कार पुढे चालू ठेवले. आलेल्या सर्व लोकांना चांगला सल्ला व अडचणीतून चांगला मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन करीत असता. अनुसया यांनी पतीच्या निधनानंतर मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी पार पडलेली होती.

समाजामध्ये काले परिवार यांना वेगळे स्थान आज सुद्धा आहे. सर्व जाती धर्मातील लोकांशी मिळून मिसळून असत. गेल्यावर्षी वयाच्या ऐंशीव्या वर्षी अनुसया यांचे दुःखद निधन झालेले होते. त्यांना भाभी या टोपण नावाने ओळखत होते. आंबेडकर चळवळीमध्ये पती, मुले असली तरीसुद्धा श्रीकृष्णाच्या निस्सिम भक्त होत्या.

सुसंस्कृत स्वभाव, मनमिळावू, प्रेमळ, अशा सर्वगुणसंपन्न श्रीमती अनुसया काले उर्फ भाभी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बारामती झटका परिवार यांचेकडून विनम्र अभिवादन. अभीवादक श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कर्तृत्वामुळे तालुक्याचा चेहरा बदलतोय, जात-पात-धर्म करू नका केवळ विकासाने लोकांचा संसार बदलत आहे – देशाचे नेते शरदचंद्रजी पवार
Next articleमाळशिरसच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लेडी सिंघम बाई माने यांच्यासमवेत श्रीनिवास कदम पाटील यांनी कार्यालयातील जुन्या आठवणींना दिला उजाळा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here