पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकेल यासाठी योग्य माणसाच्या सहवासात राहणे काळाची गरज – सज्जन मोहनराव दुरापे कार्याध्यक्ष, शिवकिर्ती युवा मंच.
अकलूज ( बारामती झटका )
शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन युवा उद्योजक किर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कायम सहवासात असणारे शिवकिर्ती युवा मंचाचे कार्याध्यक्ष निष्ठावान कार्यकर्ता सज्जन मोहनराव दुरापे यांनी कार्यक्षम युवा नेते कीर्तीदादा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत.
आपल्या दिव्यदृष्टीत आहे, उत्तुंग भरारी घेण्याचे, हाती घेऊ त्याचं सोनं करण्याचे, हे स्वप्न नयनाचे… उत्तुंग व्यक्तिमत्व किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील साहेब. पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकेल, यासाठी योग्य माणसाच्या सहवासात राहणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाला आपुलकीने वागवणारे खंबीरपणे साथ देणारे, आमचे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे किर्तीदादा. कार्यकुशल, दमदार, सक्षम आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे दादासाहेब. दादासाहेब यांच्या सहवासात राहिल्यामुळे आयुष्याचं सोनं होतं, अशी अनेक उदाहरणे आहेत. साहेबांच्या सहवासामुळे माणूस स्वावलंबी बनतो. स्पष्ट बोलणे, धाडसी निर्णय, तत्पर अंमलबजावणी म्हणजे दादासाहेब. एक वेळ जेवण कोणीही देईल पण आयुष्याची शिदोरी देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे दादासाहेब. उद्योग व्यवसायातही दादासाहेबांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. उदाहरणार्थ कन्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉटेल त्याचबरोबर शेतीतही दादा साहेबांचं विशेष असे लक्ष असते. माणूस मंदिरामध्ये गेल्यानंतर लाखो करोडो रुपये मिळावे, अशी देवाकडून अपेक्षा करतो. त्यासाठी मंदिरातील दानपेटीत माणूस खिशातील काही रक्कम देतो. मात्र या देवापाशी काही न देता माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं.

आपल्या जवळच्या आणि सहकाऱ्यांचे चांगलं व्हावं अशी मनापासून दादासाहेबांची अपेक्षा असते. त्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे दादासाहेब उभे असतात. संकट काळात दादा सदैव साथ देतात. असे हे व्यक्तिमत्त्व आहे. अशा या दूरदृष्टीच्या दादासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हिच छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा दादासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा – श्री. सज्जन मोहन दुरापे (साळुंखे) कार्याध्यक्ष, शिवकिर्ती युवा मंच
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng