किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचा सप्ताह.

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकिर्ती युवा मंचाचा स्तुत्य उपक्रम – कार्याध्यक्ष सज्जन दुरापे.

अकलूज ( बारामती झटका )

युवकांचे हृदयसम्राट युवा उद्योजक किर्तीध्वजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचा सप्ताह अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकिर्ती युवा मंच शाखा अकलूज यांच्यावतीने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे शिवकिर्ती युवा मंचाचे कार्याध्यक्ष सज्जन मोहन दुरापे यांनी माहिती दिली.
युवा उद्योजक किर्तीध्वजसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक 17/0 3/2022 रोजी सकाळी 10 वाजता माळीनगर येथील निंबाळकर कॉम्प्लेक्स येथे गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. शुक्रवार दिनांक 18 /03/2022 रोजी सकाळी 10 वाजता पंढरपूर येथील नवरंगे शासकीय बालक आश्रम व प्रभा हिरा पालवी बालक आश्रमातील मुलांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम सज्जन दुरापे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. शनिवार दिनांक 19/03 /20 22 रोजी सकाळी 10 वाजता वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम दीपक शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. रविवार दिनांक 20/0 3/ 20 22 रोजी सकाळी 10 वाजता गारअकोले येथे रक्तदान शिबिर व विविध कामांचे उद्घाटन सतीश भाऊ पवार सतीश केचे अण्णासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सोमवार दिनांक 21/0 3/ 20 22 रोजी सकाळी दहा वाजता अकलूज येथील कौलारू शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अनिल उघडे राहुल बोबडे प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. मंगळवार दिनांक 23/0 3/ 20 22 रोजी सायंकाळी सात वाजता वेळापूर येथील शिवरत्न कंस्ट्रक्शन स्टाफ व एन एच आय यांच्या तर्फे सत्कार राजेंद्र घोरपडे नरसिंह करडे अशोक निकम नागेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. बुधवार दिनांक 23/03/2022 रोजी सकाळी दहा वाजले पासून शिवकिर्ती बंगला शंकरनगर अकलूज येथे वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न होणार आहे तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवकिर्ती युवा मंचाचे कार्याध्यक्ष सज्जन मोहन दुरापे यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता पार्टीच्यावतीने बारामती येथील मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा.
Next articleकंटेनरला पाठीमागून दुचाकी धडकून प्रगतिशील शेतकरी ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here