कुसमोड येथील यल्लामा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

पिलीव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील यल्लामा देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ४ डिसेंबर रोजी पालखीचे मंदीराजवळ आगमन,५ डिसेंबर रोजी देवीचा महानैवेद्य तर ६ डिसेंबर रोजी पहाटे देवीच्या फुलाचा मान चंद्रकांत सरगर यांना महाआरती डॉ उत्तमराव सरगर यांच्या हस्ते, सकाळी 9 वाजता माहेरासाठी पालखीचे गावात आगमन,सकाळी ११.३० मानकरी संतोष व्होनमाने यांच्या हस्ते तलवार उचलणे कार्यक्रम, त्यांनंतर दुपारी 2.45 वाजता अशोक सातपुते यांच्या घराजवळील कुंडाजवळ पालखीचे आगमन,कुंडाचा नारळ सरपंच तुषार लवटे यांच्या हस्ते फोडण्यात आला तर वेशीमध्ये मानकरी अशोक राजगे, सागर व्होनमाने ,पुजारी सिद्धेश्वर व्होनमाने यांच्या हस्ते फोडण्यात आला त्यानंतर पालखीचे मंदीराकडे प्रस्थान झाले. पालखी बरोबर जगाचे मानकरी उत्तम मोरे उपस्थित होते .यानंतर हजारो भावीक भक्तांच्या उपस्थितीत अग्नी होमातुन प्रवेशाचा कार्यक्रम झाला याची सुरुवात श्याम धायगुडे यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आला.अग्नी होमाच्या माळेचे मानकरी सतीश व्होनमाने व गणेश व्होनमाने, यांना देण्यात आला. यावेळी तुकाराम व्होनमाने, सदाशिव व्होनमाने, मधुकर व्होनमाने, ज्ञानदेव व्होनमाने, चंद्रकांत सरगर, डाक्टर सुरेश सातपुते, प्रकाश मोरे,रामा पालखे,ज्ञानदेव सातपुते, प्रमोद मोरे,गौतम मोरे,सिद्धेश्वर व्होनमाने, नवनाथ व्होनमाने, सतीश व्होनमाने, यांनी अग्नी होमातुन प्रवेश केला.यावेळी मळोली येथील बाळासाहेब जाधव यांनी एक किलो चांदीची मुर्ती भेट दिली. या सदर संपूर्ण यात्रा कालावधीत अजित व्होनमाने, लक्ष्मण पालखे,दशरथ व्होनमाने, प्रशांत व्होनमाने, मल्हारी सातपुते, दत्ता भालेराव, सचीन व्होनमाने यांनी विशेष सहकार्य केले. तर कुसमोड ग्रामपंचायतीच्या वतीने भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. सदर यात्रेसाठी कुसमोड व आसपासच्या परीसरातील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. तेजस शिंदे मांडवे आणि चि. सौ. का. अनुजा देडे नाणेवाडी व चि. सौ. का. प्रांजली शिंदे मांडवे आणि चि. पार्थ देवकाते मेखळी यांचा शाही शुभविवाह संपन्न होणार.
Next articleआर्थिक सक्षमीकरण हाच एकमेव पर्याय -बागल संभाजी ब्रिगेडचे पुण्यात 28 डिसेंबरला रौप्य महोत्सवी अधिवेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here