कुसमोड येथील विकास वाघमारे या युवकाची अज्ञात व्यक्तींकडून हत्या

पिलीव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील विकास सोपान वाघमारे (वय ३५) या युवकाची शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीनी काठ्यांनी दोन्ही कानावर मध्यभागी, दोन्ही हातावर, पायावर, हत्याराने डोक्यावर, पाठीवर, छातीवर जोरदार मारहाण केल्यामुळे ते जागेवरच मयत झाल्याची घटना घडली आहे.

मयत विकासचे पाय व तोंड दोरीने बांधल्याचे दिसत होते. मयत विकासच्या पोटावर, पाठीवर, डोक्यावर, छातीवर प्रचंड मारहाण केल्याचे आढळून आले. सदरची घटना विकास वाघमारे आपल्या मालकीची कुसमोड येथील जमीन गट नं २३१/१/अ येथे विहीरीलगत पाणी देत असताना घडुन आली. सदरच्या घटनेची माहीती समजताच पिलीव औट पोस्टचे सतीश धुमाळ व जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर घटनास्थळी अकलुजचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, हवालदार दत्ता खरात, कणसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मयत विकास याचे माळशिरस येथे शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत विकास वाघमारे याच्या या हत्येबद्दल अज्ञात व्यक्ती विरोधात त्याचा भाऊ सुहास सोपान वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.

३०२ कलमान्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी शोध पथके पाठविली आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत. विकासचा खुन जमीनीच्या वादातुन झाला की इतर कारणावरुन, याची चर्चा पिलीव परीसरात सुरु आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथील ऐतिहासिक राजकीय वारसा असणारे देशमुख घराण्यातील मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख नातेपुते नगरीचे पहिले उपनगराध्यक्ष बनले – सत्तारभाई नदाफ.
Next articleबदलापूर येथे रेल्वे प्रवासी संघटनेची प्रथम सभा उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here