बारामती (बारामती झटका)
महाडीबीटी पोर्टल राज्य कृषि यांत्रिकीकरण 2020-21 अंतर्गत बारामती तालुक्याती मौजे झारगडवाडी येथील इंदुबाई आनंदराव जाधव यांना कृषि औजारे बँक अंतर्गत 3 ट्रॅक्टर, मित्रा ब्लोअर आणि मिनीडा मिलचा लाभ देण्यात आला आहे.
या औजारांचे उद्धाटन आज पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, आणि उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याहस्ते विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पार पडले. यावेळी लाभार्थी इंदुबाई जाधव, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल व अधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng