मोरोची ( बारामती झटका )
मोरोची येथे विठल सोनमळे यांच्या शेतावर हरभरा पिकाच्या शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी तालुका कृषि आधिकारी मा सौ पुनम चव्हाण म्हणाल्या की कृषि विभागांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास कृषि विभागाच्या महाडिबीटी वेब साईटवर जाऊन एकाच अर्जावर विविध योजनांची माहिती भरुन जास्तीत जास्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे अवाव्हन केले
मंडल कृषि अधिकारी सतिश कचरे म्हणाले की वर्षानुवर्षे ऊसाचे पिक घेतल्यामुळे ऊसाचे उत्पन्न घटत चालले आहे रासायनिक खतांचा व पाण्यांचा जास्त वापरामुळे व पाचट शेतात जाळल्यामुळे जमिनीचा पोत कमि होत चालला आहे जमिनीचा सामु 8.50च्यावर गेला आहे याचे प्रमुख कारण शेतात पाचट जाळणे आहे जमिनिया पोत व सुपिकता टिकुन राहण्यासाठी ऊसाचे पाचट कुजवुन सेंद्रिय खत तयार करण्याच्या विविध पद्धतीची माहिती दिली.

आत्माचे कुलदिप ढेकळे यांनी हरभरयाच्या एकात्मिक रोग व किड व्यवस्थापन मध्ये जैविक किड नियत्रंण या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित व सुत्र संचालन मोरोचीचे कृषि सहाय्यक विजय कर्णे यांनी केले
कार्यक्रमास मा. सौ पुनम चव्हाण तालुका कृषि आधिकारी सतिश कचरे मंडल कृषि आधिकारी उदय साळुंखे गोरख पाढंरे कृषि पर्यवेक्षक आत्मा प्रमुख कुलदिप ढेकळे कृषि सहाय्यक विजय कर्णे, सचिन दिडके, नवनाथ गोरे, रणजित नाळे, दत्तात्रय पाढंरमिसे, हनुमंत खरात, विजय दुधाळ, लालासो माने, कांतिलाल माने, अमित गोरे, सरपंच समाधान गोरे, उपसरपंच बाळासाहेब माने प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय सुळ(सर), दादासाहेब सुळ, विठठल सोनमळे, चंद्रकांत भोसले, ईश्वर सुळ, अशोक माने, कृषि मित्र सुभाष सुळ व भहुसंख्य शेतकरी अपस्थित होते. शेतीशाळे विषय मनोगत दत्तात्रय सुळ(सर) व
आभार प्रदर्शन कृषि पर्यवेक्षक उदय साळुंखे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng