सोलापूर (बारामती झटका)
‘हरित क्रांती श्वेत क्रांती’ इतर कृषि क्षेत्रातील क्रांतीमुळे नाशवंत फळे, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, मत्सोत्पादन, दुग्ध उत्पादन, पशु उत्पादन व वनउत्पादने यामध्ये खुप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यामुळे शेतीमाल भावातील उतार, मागणीपेक्षा जास्त पुरवठा व उत्पादन यामुळे शेतीमालाची नासाडी होऊन शेतकरी बंधूच्या तोट्यात वाढ होऊ लागली. यावर उपाय म्हणून अन्न प्रक्रियास चालना, बौधीक व आर्थिक सहाय्य देऊन छोटे छोटे अन्न प्रक्रिया उद्योजक निर्माण करण्यासाठी व प्रस्तावीत उद्योग विस्तार करण्यासाठी युवक, महिला, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक, स्वयंसहायता गट कंपनी, संस्था, सहकारी संस्था, सहउत्पादक यांना छोटे उद्योजक बनविण्यासाठी केंद्र शासन अनुदानीत सन २०२० – २१ ते २०२४ – २५ या कालावधीसाठी मा. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु करण्यात आली आहे.
(PAFME ) या योजनेअंतर्गत उद्योजकांना लाभ देऊन पत मर्यादा वाढविणे, उत्पादनाचे बॅन्डीग करणे, विपननसाठी मदत पुरवठा साखळीशी जोडणे, चालू सुक्ष्म उदयोग विस्तार औपचारिक रचनेमध्ये आणणे, सामाईक प्रक्रिया केंद्र, सुविधा प्रयोगशाळा, साठवणूक पॅकिजीग सुविधा उद्योजकांना व्यवसायीक व तांत्रीक सहाय्य व लाभ देणे हा उद्देश ठेवून योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेतून खालील प्रकारचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे – १ )अर्जदार प्रशिक्षण 100% अर्थसहाय्य २ ) वैयाक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया केंद्र – बॅक कर्ज निगडीत प्रकल्प खर्चाचे ३५ % १०लाख कमाल मर्यादा ३ ) शेतकरी गट ‘शे उत्पादक कंपनी स्वयंसहाय्यता गट उत्पादक सहकारी संस्था – बॅक कर्ज निगडीत प्रकल्प खर्चाचे ३५ % १० लाख कमाल मर्यादा, ४ ) स्वयं सहाय्यत गट छोटी मशिनरी खरेदी – प्रति सदस्य ४० हजार मयोदेपर्यत, ५ ) इनक्युबेशन सेंटर – शासकिय संस्था १००%, खाजगी संस्था ५०%, अनुसुचीत जाती जमाती संस्था ६०% अर्थसहाय्य अशा प्रकारे योजनेचे स्वरूप आहे. तरी छोटे अन्न प्रक्रिया उद्योजक व स्थित उद्योगाचा विस्तार करण्याची रोजगार निर्माण करण्याची संधी वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहाय्यत गट, कृषि गट, कंपनी, संस्था यांनी दवडू नये, असे आवाहन मंडल कृषि अधिकारी सतीश कचरे यांनी केले आहे.
एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारी व आधारित अन्न प्रक्रिया उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. श्री. रफीक नाईकवाडी विभागीय कृषि सहसंचालक पुणे जिल्हा स्तरावर या विषयाचा विषय तज्ञ (RP) आहे. फॉर्म भरल्यानंतर संबंधीताना बौधीक तांत्रीक, प्रकल्प अहवाल बँक पत मर्यादा इ. सर्व बाबीबाबत मार्गदर्शन केले. श्री. बाळासाहेब शिंदे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यक्षेतातील मंडल कृषि अधिकारी या योजनेचे नोडल अधिकारी आहेत. आधिक महितीसाठी नजीकचे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकाकडे संपर्क साधावा – श्री. रविन्द्र कांबळे उपविभागीय कृषि अधिकारी, पंढरपुर.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng