कृषि विभाग साद शेतकरी बांधव प्रतिसाद पीक स्पर्धा व विजेते – श्री‌‌. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उत्पादकता बाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्याची इच्छाशक्ती मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन उद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल. तसेच विजेत्यामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन घेऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश राज्याअंतर्गत पीक स्पर्धा खरीप २०२१ मध्ये तालुक्यातील मका, बाजरी या पिकासाठी राबविण्यात आली होती. त्या पिक स्पर्धेत पुणे विभाग (नगर, सोलापूर, पुणे जिल्हा) स्तरावरील श्री. किसन दशरथ वाघमोडे, फोंडशिरस यांनी 14,962 किलो प्रति हे उत्पादन काढून पुणे विभाग प्रथम क्रमांक मिळविला. श्री. मच्छिंद्र विठ्ठल जाधव, पळसमंडळ यांनी 14,820 किलो प्रति हे उत्पादन काढून द्वितीय क्रमांक मिळविला. श्री. कृष्णांत संभाजी करे मोटेवाडी (फों.) 14,820 किलो हे उत्पादन काढून पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळविली आहे.

सोलापूर जिल्हा स्तरावर श्री. महादेव डोंगरी दडस, पिरळे यांनी 14,772 किलो प्रति हे उत्पादन काढून जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळविला आहे. श्री. महादेव देनाजी काळे, नातेपुते यांनी 14,770 किलो उत्पादन प्रति हे काढून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. श्री. दिलिप शंकर तांबे, तांबेवाडी यांनी 14,748 किलो प्रति हे उत्पादन काढून जिल्हास्तर तृतीय क्रमांक मिळविला आहे.

वरील सर्व लाभार्थी महाराष्ट्रातील पहिले ISO-9001:2015 मानांकित मंडळ कृषि अधिकारी कायालय नातेपुते कार्यक्षेत्रातील आहेत. ‘या शेतकरी बंधूनी महाराष्ट्र शासन – कृषि विभाग, मंडळ कृषि अधिकारी नातेपुते अधिकारी, कषि पर्यवेक्षक व संबंधीत गावचे कृस ‘कृसे’ यांच्या सादाला प्रतिसाद देऊन पीक स्पर्धेत विभागस्तर जिल्हास्तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी विक्रमी उत्पादन घेऊन गावाचे तालुक्याचे जिल्ह्याचे नाव केले. त्या सर्वाचे कृषि विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे वतीने हार्दिक अभिनंदन व आम्हाला यांचा अभिमान आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथील जगताप कलेक्शनमध्ये ग्राहकांचा खरेदीसाठी धुमधडाका
Next articleKurs Rubel rosyjski RUB :: Kursy walut NBP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here